मेहकर:- स्थानिक महेश विद्यामंदिर येथे हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. भारत स्काऊट गाईड चे प्रमुख धरम टाक यांच्या मार्गदर्शनाखाली दहा ते पंधरा सप्टेंबर दरम्यान हिंदी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिवसानिमित्त नाटिके द्वारे हिंदी भाषेचे महत्त्व पटवून देण्यात आले. नाटिकेचे संचालन कोमल डहाळे व आचल गोफण या विद्यार्थिनीने केले. तर नाटिकेत मुख्य भूमिकेत आरती भारस्कर, आस्था दागडिया, शरयू काकडे, उन्नती दायमा व आरुषी मलोसे या विद्यार्थिनीने आपल्या अभिनयाने सगळ्यांचे मन जिंकत हिंदी भाषेचे महत्त्व पटवून दिले. संस्था अध्यक्ष डॉक्टर सुभाष लोहिया सचिव गोपाल भाऊ मोदी सोनी प्राचार्य ज्योती मंत्र मॅडम उपप्राचार्य गायकवाड सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नीरज सर, रसाळ सर, देशमुख सर, वडुळकर मॅडम व इतर सहकाऱ्यांनी मदत केली.