चिखली : जिल्हाभरात लंपी या आजाराने थैमान घातलेले असुन त्यामूळे पशु पालक मोठ्या चिंते मध्ये आहे. त्यामूळे आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी चिखली विधान सभा मतदार संघातील प्रत्येक पशु वैद्यकिय दवाखान्यात लंपिरोधक लसीकरण शिबिरे आयोजित करण्यात आलेली आहे. त्याचाच भाग म्हणून काल दि 19/9/2022 रोजी चिखली तालुक्यातील सवणा , बोरगाव वसू, एकलारा तसेच बुलडाणा तालुक्यांतील धामणगाव येथे लसिकरण शिबिरे संपन्न झाले. या लसीकरण शिबिराचा पशु पालकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला आहे .
पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसा पासून ते महात्मा गांधी यांच्या जयंती पर्यंत सेवापंधरवाडा अंतर्गत चिखली विधानसभा मतदारसंघाचा लोकप्रिय आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या संकल्पनेतून संपन्न झालेल्या या लसीकरण शिबिराच्या यशस्वीतेसाठी भाजपा तालुकाध्यक्ष ॲड.सुनील देशमुख, भाजपा नेते डॉ.तेजराव नरवाडे साहेब, जेष्ठ नेते काशिनाथ टाकसाळ, मधुकर सपकाळ, सुभाष देवकर, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष योगेश राजपूत, धाड शहराध्यक्ष विशाल विसपुते , डॉ. शाम घरे, डॉ. मोरे साहेब, सुनील जाधव, राजेश अंभोरे, गणेशराव अंभोरे, विकास अंभोरे, विवेक अंभोरे, काशीराम वाकडे, गजानन उगले, शाम येळवंडे, आत्माराम काळे, भाजपा युवा मोर्चाचे सचिव बंडू अंभोरे, संजय पुरी, भाजपा नेते रामकृष्ण आंभोरे, शिवसेना नेते रोडूबा काका वाकडे, पांडुरंग कुरकुटे, भानुदास पाटील अंभोरे, नामदेव तोंडे, गिरी टेलर नंदकिशोर देशमाने, गजानन कुरकुटे, श्रीराम फाटे, बंडू कदम, रामेश्वर अंभोरे, अमोल अंभोरे, शाम तोंडे, गजानन शेवत्रे, संदीप खरात, दत्तू अंभोरे, अनिल अंभोरे, कडूबा आंभोरे, डॉ. कोल्हे साहेब, डॉ. भुसारी साहेब, डॉ. महेंद्र गवई ,सरपंच प्रतिनिधी दिलीप सुरडकर, ग्रामपंचायत सदस्य दिपक सिनकर, हिरालाल बोडखे, समाधान पायघन, अंबादास भुते, रमेश काळे, समाधान सिनकर आदी मान्यवरांसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी मासरुळ येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाचे अधिकारी डॉ.वसंत हंगे साहेब यांच्या नेतृत्वात डॉ.हरिओम शेळके व डॉ.श्रीकृष्ण सिनकर यांनी शेकडो जनावरांना संसर्गजन्य होणाऱ्या लम्पी आजारांवर प्रतिबंधक लसीकरण केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाजपा तालुका उपाध्यक्ष देवेंद्र पायघन, ओबीसी मोर्चा तालुका सरचिटणीस राजेश अपार यांनी विशेष परिश्रम घेतले.
Users Today : 22