अकोला (भुषण महाजन) – राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा दि. 17 सप्टेंबर ते दि. 2 ऑक्टोबर 2022 पर्यंत अकोला जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या कालावधीत 11 व 12 वी विज्ञान शाखेत शिकत असलेल्या तसेच व्यावसायीक प्रशिक्षणास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाकरीता जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य विजय साळवे यांनी केले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या निर्देशानुसार 11 व 12 वी विज्ञान शाखा तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाकरीता प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांकरीता जात प्रमाणपत्र पडताळणी शिबीराचे दि. 27 सप्टेंबर रोजी आर.एल.टी. महाविद्यालय, अकोला येथे तसेच मुर्तिजापुर येथील श्री. गाडगे महाराज महाविद्यालयामध्ये दि. 28 सप्टेंबर रोजी, दि. 29 सप्टेंबर रोजी अंजुमन अन्वरुल इस्लाम हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, बाळापूर येथे तसेच दि. 30 सप्टेंबर 2022 श्री. शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय, अकोट जि.अकोला येथे आयोजन करण्यात आलेले आहे. अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यास इच्छुक असलेले विद्यार्थ्यांनी अद्यापर्यंत जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज केला नाही त्यांनी दि.2 ऑक्टोंबरपर्यंत शिबीर ठिकाणी परिपूर्ण ऑनलाईन केलेल्या अर्जासह, आवश्यक कागदपत्रे व मुळ कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य विजय साळवे यांनी केले आहे.