पातुर पत्रकार आणि वकील यांच्या पुढाकारातून अज्ञात महिलेचे वाचले प्राण…

Khozmaster
4 Min Read
पातुर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पातुर घाटाचे पायथ्यापासून चालत राज्य मार्गाने अकोला मार्गाकडे पातुर मार्गावरून निर्जन मार्गावरून रात्रीच्या वेळेस जात असलेल्या एका अज्ञात युवतीचा प्राण ज्येष्ठ पत्रकार देवानंद गहिले आणि एडवोकेट विजय बोरकर यांनी घेतलेल्या पुढाकारातून या महिलेचे प्राण आपले असल्याचे घटना रविवारी रात्री 7/45 वाजता झाली आहे
सदर ही महिला कुठून आली कशी आली याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही
ही महिला रविवारी वाशिम ते अकोला राज्य मार्गाने निर्जन मार्गावरून एकटी जात होते
यावेळी येथील समाजसेवक वकील एडवोकेट विजय बोरकर यांचे शेत या राज्य मार्गाच्या शेजारी पातूर येथील कवळेश्वर शिवारात असल्याने या मार्गावरून पातूर येथील एडवोकेट विजय बोरकर यांना ही महिला दिसली तेव्हा बोरकर यांनी या महिलेला संवाद करण्याचा प्रयत्न केला मात्र या महिलेने काहीच प्रतिसाद दिला नाही
त्यामुळे बोरकर यांनी पत्रकार श्री देवानंद गहिले यांना मोबाईल द्वारे संपर्क करून ही माहिती दिली
त्यावरून या घटनेची तात्काळ दखल घेऊन श्री गहिले यांनी
या दोघांचे शोध घेऊन तोपर्यंत ही महिला रस्त्याने चालत होती
रस्त्यावर कोठे अंधार तर कोठे रस्त्यावरील लाईट होते अशा अवस्थेत युवतीचा शोध घेतला आणि बोरकर व गहिले यांची पातुर तुळजापूर मलकापूर गावाचे शिवारात राज्य मार्गावर भेट झाली आणि यातून दोघांनी या युवतीला विचारण्याचा प्रयत्न केला परंतु तिने संवाद साधला नाही आणि प्रतिसाद दिला नाही आणि ती झपाट्याने अकोला रोड कडे चालतच होती
या घटनेची माहिती बोरकर यांनी पातूरचे ठाणेदार हनुमंत डोपेवाड यांना दिली
यांनी लोकेशन विचारून गाडी पाठवली
या महिले सोबत पत्रकार गहिले आणि बोरकर यांनी तब्बल पाच किलोमीटर रस्ता पार केला
 त्यानंतर या मार्गावर काही अंतरावर पातूर पोलिसांची गाडी आली
आणल्या युवतीला गाडीमध्ये बसवले ती गाडीमध्ये बसायला तयार नव्हती त्यानंतर ती बसली
या प्रसंगी पातुरचे पोलीस कर्मचारी शेखरवार ठाकूर , आकाश जाधव, दिपाली सपकाळ या कर्मचाऱ्यांनी विशेष महत्त्वाची भूमिका पार पडली
यामध्ये पोलीस गाडीत बसवतात म्हणून यातील दिपाली सपकाळ यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला
मात्र सिताफिने पातुर पोलिसांनी तिला गाडीत बसवले
पातुर पोलिसात आणल्यानंतर
तिला जेवण दिले त्यानंतर ती थोडी रिलॅक्स झाली आणि बोलू लागली त्यानंतर ती खूप बोलली मात्र तिने कुठलीही माहिती दिली नाही
या युवतीचे वय जवळपास 30 वर्षाचे होते तिने लग्न केले नाही असे बोलताना सांगितले
आणि ती शुद्ध मराठी हिंदी बोलत होती या महिलेला अकोला येथील सुधार गृहात पोलिसांनी पाठवले आहे
अनेक वेळा अपघातापासून वाचली
रस्त्याने झपाट्याने महिला चालत असताना रात्रीला अंधारामध्ये अनेक वाहने तिच्या जवळून गेली तिचे दैव बलवत्तर म्हणून ती अपघातापासून वाचली आहे वाशीम अकोला हा पातुर वरून जाणारा अतिशय वर्दळीचा आहे या मार्गावर अपघात ब्लॅक स्पॉट अपघाताचे आहेत या मार्गावर माजी आमदार सरनाईक यांच्या कुटुंबाचा अपघात झाला होता याच ठिकाणी या महिलेला अपघातापासून वाचवण्याकरता ताब्यात घेतल्याने अपघातापासून महिला वाचली आहे
पातुर ठाणेदार हनुमंत
डोपेवाड यांनी घेतली तात्काळ दाखल
पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना ही घटना माहीत होतात त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनची गाडी पाठवली
 त्यामुळे हनुमंत
डोपेवाड यांच्या कर्तव्यदक्षिणेमुळे सुद्धा या महिलेचे प्राण वाचले आहेत त्यामुळे ठाणेदार हनुमंत डोपेवाड यांचे कौतुक करण्यात आले आहे
तसेच पत्रकार, पोलीस, वकील हे सजग असल्याने या अज्ञात महिलेचा प्राण वाचला आहे.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *