हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मूर्तिजापूर दणाणले..!

Khozmaster
1 Min Read
मूर्तिजापूर येथे आज हजारो शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा निघाला. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दहीहंडी फोडण्यात आली. हजारो शेतकऱ्यांनी सरकार विरुद्ध घोषणाबाजी करत अक्षरशः मूर्तीजापुर दणाणून सोडले होते. सोयाबीन-कापसाला भाव नाही. गेल्या वर्षीचा पिकविमा नाही, नुकसान भरपाई नाही. यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्याची वेळ आली आहे. तरीही सरकारला शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागणी नसलेल्या योजनांवर सरकार पैसे खर्च करते, पण शेतकरी-कष्टकऱ्यांना द्यायला सरकारकडे पैसे नाही. त्यामुळे सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांचा मूर्तिजापूर मध्ये आक्रोश पाहायला मिळाला. शेतकऱ्यांनी एकजुट दाखवत राजकीय वोट बँक तयार करणे गरजेचे आहे. तरच सरकार शेतकऱ्यांवर लक्ष देईल. सरकारने तातडीने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढावा. अन्यथा महाराष्ट्रातील शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यासमोर शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दहीहंडी फोडतील, असा इशारा यावेळी दिला.
यावेळी श्री.गजानन अमदाबादकर,(वाशिम )श्री अमित अढाऊ(अमरावती ) प्रा. तिडके सर (अकोला ),गजानन कावरखे(हिंगोली ), नामदेव पतंगे(हिंगोली ), सतीश ईडोळे(वाशिम ), श्रीकांत ठाकरे(कारंजा लाड ), सुमित नवलकर (अकोला )संजय सोनुने(पातूर )यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
तर मोर्चाचे यशस्वी आयोजन श्री.चंद्रशेखर गवळी, नितीन गावंडे, राहुल वानखेडे, रियाज शेख, नितीन खेडकर, निलेश घुलाने, शुभम जवंजाळ, रामदास भगत, अरुण धरमाळे यांच्या शेतकरी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले होते.
0 8 9 4 7 5
Users Today : 5
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *