चिखली/प्रती.: 15 ऑगस्ट 2022 ला प्रत्येक भारतीयाने 75 वा स्वातंत्र्य अमृत महोत्सव साजरा केला. या अमृत महोत्सव निमित्त हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत सर्व भारतीयांनी आप आपल्या घरी ध्वजारोहण करून या अमृत महोत्सवाला प्रतिसाद दिला. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या महापुरुषांना अभिवादन करून त्यांच्या योगदानाची यशोगाथा प्रत्येक स्तरातून जगासमोर मांडण्यात आली. या वेळी ज्या महापुरुषांनी आपले जीवन समर्पण केले त्यामध्ये स्त्रियांसाठी शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्यात मोलाचे योगदान देणाऱ्या प्रथम भारतीय महिला शिक्षिका फातिमा शेख यांचा उल्लेख करणे क्रमप्राप्त ठरते. फातिमा शेख यांची जयंती तिथी नुसार 21 सप्टेंबर नुसार आज स्वर्गीय राजाभाऊ बोंद्रे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे साजरी करण्यात आली. या वेळी रिपब्लिकन सेना बुलडाणा जिल्हा अध्यक्ष भाई विजयकांत गवई,बुलडाणा जिल्हा महासचिव सलीमभाई, बुलडाणा जिल्हा उपाध्यक्ष ब्रम्हाभाऊ साळवे, प्राचार्य श्री इंगळे सर, उप प्राचार्य खान फेरोज सर यांची प्रमुख उपस्थिती होती
भारतात अंध विश्वास पसरविणाऱ्या मनुवादी समाजाने दलीत, मुस्लिम व मागासवर्गीय महापुरुषांच्या जन्म व मृत्यू च्य तारखा या स्पष्ट पणे अधोरेखित न करता द्विपक्षीय लिहिल्या आहे. अशाच प्रकारे सावित्री बाई फुले यांना मोलाचे सहकार्य करणाऱ्या फातिमा शेख यांची जयंती ची नोंद सुद्धा द्विपक्षीय असून तिथी नुसार आज दिनांक 21 सप्टेंबर 2022 रोजी फातिमा शेख यांची जयंती साजरी करण्यात आली. फातिमा शेख यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले या वेळी रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी अन्सार भाई, सुनील सोळंके, शेख वसीम, ऋषिकेश हिवाळे, शेख दानिश, सौरभ बावस्कर, राजाभाऊ बोंद्रे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालआतील विद्यार्थि शिक्षक व इतर कर्मचारी अरुंद हजर होते.
फातिमा शेख नसत्या तर आज महिलांना शिक्षण घेता आले नसते : – भाई विजयकांत गवई
भारत इंग्रजांच्या गुलामगिरीत असताना इंग्रजांची हुजरेगिरी करणाऱ्या देशद्रोही वृत्त्तीच्या लोकांनी महीलांनां शिक्षणाचा अधिकार नसल्याचे सांगत शिक्षणा पासून वंचित ठेवले होते. अशा वेळी देशातील एका मुस्लिम महिलेने पुढाकार घेत आपल्या पतीच्या सोबत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पत्नी सावित्री बाई फुले यांना मदत करीत शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले. फक्त शिक्षण न देता आपले घर सुद्धा ज्योतिबा फुले व सावित्री बाई फुले यांना दिले व प्रथम महिलांची शाळा सुरू केली. अशा महान शिक्षिका, समाज सुधारक यांचा परिचय आजच्या पिढीला होणे गरजेचे आहे. अशा महान समाज सुधारक फातिमा शेख यांची जयंती साजरी करणे आपले कर्तव्य असून समाजाच्या प्रत्येक घटकाने त्यांची जयंती साजरी करावी.
Users Today : 23