विनोद वसु अकोट ता प्रतिनिधी:::: रेल येथे बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प २०२२-२३ अंतर्गत दिनांक २० सप्टेंबर रोजी शेतकरी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना विषय विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र अकोला येथील डॉ. चारुदत्त ठीपसे यांनी बोंड अळी प्रमाणे बोंडसळ यावरही लक्ष देण्याचा सल्ला दिला पुढे कापूस पिकावरील कीड व रोग नियंत्रण, पीक लागवड आणि तंत्रज्ञान आदी विषयावर शेतकऱ्यांना चर्चेतून मार्गदर्शन केले.
यावेळी मंडळ कृषी अधिकारी ए आर भारसाकळे, कृषी पर्यवेक्षक ए के देशमुख, कृषी सहाय्यक डी व्ही जाधव, एम जे सदांशिव, कृषी मित्र, समूह सहाय्यक, गावातील प्रतिष्ठित नागरिक, स्मार्ट कॉटन गटातील सदस्य आणि शेतकरी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता यानंतर त्यांनी शेतात जाऊन पीक परिस्थितीवरही शेतकऱ्यांशी चर्चा केली.