लोकसहभागाच्या माध्यमातून गावाचा विकास साधावा – गजानन पाटोळे

Khozmaster
2 Min Read

ज्ञानेश्वर सुपेकर
लोणार – गावाकऱ्यांनी दृढ मानसिकतेतून तसेच सामाजिक ऐक्य साधून लोकसहभागातुन विकास साधावा असे आवाहन गजानन पाटोळे गटविकास अधिकारी पंचायत समिती लोणार यांनी भूमराळा येथे महिला सक्ष्मीकरना च्या माद्यमातून महिला बचत गटास लघु व्यवसाया साठी आदर्श गांव संल्कल्प व प्रकल्प तसेच जिजामाता शिक्षण क्रीडा व बहू उधेशीय संस्था दगड वाडी यांचे माध्य मातु न महिला बचत पंधरा गटास पंचवीस हजार रुपयाचे धनादेश वाटप करण्यात वाटप करण्यात आले आले. यावेळी त्यांनी आवाहन केले.
या वेळी त्यांनी त्याचबरोबर बदलत्या काळानुसार शेतीमध्ये जैविक शेतीस प्राधान्य देऊन आरोग्य समस्या सोडवण्याची गरज असल्याचे मत प्रदर्शित केले तसेच या संदर्भात कोणत्याही प्रकारचे सहकार्य लागल्यास पंचायत समिती लोणार तसेच आदर्श गाव योजनेच्या माध्यमातून आपणास सहकार्य करण्या चे आश्वासन दिले.

यानंतर संस्थेचे अध्यक्ष गजानन जायभाये यांनी आतापर्यंत केलेल्या विविध कामांचा तपशील सन्माननीय व्यासपीठ व महिला तसेच गावकरी यांना नमूद केले यामध्ये प्रामुख्याने पहिल्या टप्प्यातील गाव विकासाची कामे जसे पाणी फिल्टर जनावरांचे पिण्याचे हौद विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका तसेच जल व मृदयसंधारणाची विविध कामे सप्तसूत्री च्या माध्यमातून व लोकसहभागाने पूर्ण केली याकरिता गावाने विविध प्रकारचे सामाजिक येथे दाखवून संस्थेस व कृषी विभागास सहकार्य केले या करिता त्यांचे आभार सुद्धा मानलेयानंतर कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक विलास जाधव, पं.स.लोणार येथील संदीप तिडके,कुमार धवस, एसबीआय बँकेचे व्यवस्थापक समीर गौतम यांनी प्रसंगानुरुप व विषयानूरुप उपस्थित महिलांना व गावकऱ्यांना मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमात उपस्थित महिलांनी स्वच्छतेविषयी व लोकसभागा विषयी बचत गटाच्या माध्यमातून भरीव कामे करण्याविषयी व्यासपीठासमोर आत्मविश्वासाने सांगितले
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श गाव प्रकल्पाचे ग्राम कार्यकर्ते लक्ष्मण टेकाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ स्वाती गजानन वाघमारे सरपंच यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी ते करिता संस्थेचे कर्मचारी ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

0 8 9 4 5 6
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *