एस.टी.कामगार तथा शेतकरी यांच्या समस्या बाबत राजसाहेब ठाकरे यांच्याशी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा

Khozmaster
1 Min Read

चिखली – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ २०१९ मधील सरळ सेवा भरतीची स्थगिती उठून सेवा पूर्व प्रशिक्षण पूर्ण झालेल्या उमेदवाराचे अंतिम वाहन चाचणी घ्यावी तसेच प्रशिक्षण बाकी असणार्‍या उमेदवाराचे प्रशिक्षण सुरू करावे व प्रशिक्षण पूर्ण झालेल्या उमेदवारांना त्वरित नियुक्ती देऊन त्यांना कामावर रुजू करून घ्यावे व दि.२९ सप्टेंबर२०२२ ची ५००० कंत्राटी कर्मचारी यांची निविदा तात्काळ रद्द करावी,शेतकऱ्यांना शेती पूरक व्यवसायासाठी लागणाऱ्या कर्जासाठी ची सिबील स्कोरची अट शिथिल करावी,शेतकरी याच्या कर्ज माफी,दुध,कांदा व इतर मागणीसाठी व जिल्ह्यात फोफावत चाललेल्या जनावरांच्या लम्पि आजरा विषयी विठ्ठल लोखंडकार राज्य उपाध्यक्ष,संपर्क अध्यक्ष बुलडाणा, अकोला,वाशीमयांच्या नेतृत्वात दि.२१/९/२०२२ ला आंबा नगरी अमरावती येथे राज साहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा संघटक शैलेश गोंधणे,महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष शैलेंद्र कापसे,चिखली तालुका अध्यक्ष विनोद खरपास, महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रदिप भवर,एस. टी. कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजेश इंगळे,विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष स्वप्नील असोले यांनी भेट घेऊन वरील समस्या संदर्भात सविस्तर चर्चा केली. या बद्दल तात्काळ मुख्यमंत्री यांना पत्र देऊन,त्याच्याशी बोलून सर्व प्रश्न मार्गी लावण्या बाबत मा. राज साहेब ठाकरे यांनी शब्द दिला या प्रसंगी सिद्धार्थ काकडे , नंदू पाटील, सचिन गवई,अर्ज खंडागळे,स्वप्नील शेळके, मुजम्मील सय्यद, दीपक धनवे,निलेश लंबे, समाधान,अर्जुन इंगळे,सुभाष शिंदे राठोड,विठ्ठल येळवंडे यांच्या सह कार्यकर्ते, शेतकरी, उपस्थित होते.

 

0 8 9 4 5 6
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *