शेतकरी अमृत जमाले यानां तात्काळ नुकसान भरपाई देण्याची; मो.आरिफ मो.लुखमान राष्ट्रवादी यु.अध्यक्ष यांची मागणी सोयगाव तालुक्यातील फर्दापूर जिल्हा परिषद सर्कलमध्ये सावळदबारा व सावळदबारा परिसरात पशुसंवर्धन विभागाच्या वतीने लसीकरण मोहीम राबविली जात असली तरी लम्पी स्किन आजाराचा धोका अजूनही टळला नसल्याचे दिसत आहे.शेतकरी व पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे.फर्दापूर सर्कलमधील सावळदबारा पशुवैद्यकीय केंद्रा अंतर्गत येणाऱ्या परिसरात आतापर्यंत नेमक्या किती गुरांना लम्पी स्किन आजाराची लागण झाली आहे.सर्कलमधील सावळदबारा पशुवैद्यकीय केंद्रा अंतर्गत येणाऱ्या सावळदबारा गावात लम्पी स्किन आजाराने पहिला बळी घेतला आहे. शेतकरी अमृत त्र्यंबक जमाले रा.सावळदबारा ता सोयगाव यांचा बैल लम्पी स्किन आजारामुळे दगावला यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या हस्ते पंचनामा करण्यात आला.यावेळी भारत गावडे,प्रकाश चोपडे, व ग्रामस्थ उपस्थित होते.अमृत जमाले याचां बैल दगावल्याने शेतकरी व पशुपालक यांच्या मधे चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.याबाबत अधिकृत आकडेवारी उपलब्ध झाली नसली तरी गुरुवारी सकाळी अमृत जमाले यांच्या बैलाचा लम्पी स्किन आजाराने मृत्यू झाल्याची घटना सकाळी दि.२२/९/२२ गुरुवारी उघडकीस आली आहे.पशुसंवर्धन विभागाच्या वेगाने लसीकरण मोहीम परिसरात चालू आहे. पशुपालक यांनी घाबरून जाऊ नये असे सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ. जी.एस.लांडगे यांनी सांगितले. गुरांना लम्पी स्क्रीन आजाराची लागण झाली असून बाधित गुरांवर तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ विनोदकुमार चव्हाण वैद्यकीय उपचार करत आहे.तरी शेतकरी अमृत जमाले याचां एक बैल गेल्याने ते हतबल झाले त्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी यु.अध्यक्ष तथा उपसरपंच मो.आरिफ मो.लुखमान यांनी केली आहे.