मेहकर :- स्थानिक महेश विद्यामंदिर च्या नावात आणखी एक यशाचा तुरा लावीत, विद्यार्थ्यांनी घडविला इतिहास. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना ओळखून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हेच महेश विद्यामंदिरचे ध्येय आहे. याच अनुषंगाने मध्यप्रदेश इंदौर येथे 16 ते 19 सप्टेंबर रोजी पार पडलेल्या सातवी संयुक्त भारतीय राष्ट्रीय तायक्वांदो चॅम्पियनशिप स्पर्धेत क्रीडा शिक्षक आरती चव्हाण मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेमध्ये महेश विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून शाळेचे नाव राष्ट्रीय स्तरावर मोठे केले. स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या राज्यातून सुमारे साडेतीन हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये महेश विद्यामंदिरच्या 18 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता त्यामध्ये उमर मिर्झा, समृद्धी महाले, दिशा राठोड, गोपाल पवार, अस्मित पैठणे, ओम मूलचंदानी, कृष्णा अग्रवाल. आयुष सुरजन व तुषार काळे या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक मिळवून घवघवीत यश संपादन केले. तसेच केदार बेहडे, कुणाल काळे, नम्रता पांडे, हर्ष हातमोडे, पियुष मूलचंदानी, विश्वजीत देशमुख व सोहम बोरे या विद्यार्थ्यांनी रोप्य पदक मिळवत यश संपादन केले. तसेच यश महाले व बुद्धभूषण मोरे या विद्यार्थ्यांनी कांस्यपदक मिळवत शाळेचे नाव राष्ट्रीय स्तरावर गाजविले. राष्ट्रीय स्तरावर मिळवलेले घवघवीत यशाबद्दल सर्वत्र विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. संस्था अध्यक्ष डॉक्टर सुभाषजी लोहिया सर, सचिव गोपाल भाऊ मोदानी, उदय सोनी शाळेच्या प्राचार्य सै ज्योती मंत्री मॅडम, उप प्राचार्य श्री गायकवाड सर, यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार करून कौतुक केले.
Users Today : 22