चिखली -गेल्या तीन दिवसापूर्वी इसरुळ मंगरुळ, ंअंचरवाडी, शेळगांव आटोळ भागात अचानक ढगफुटी होवून नदी नाले तुडुंब भरुन अनेक शेतात व नदीकाठच्या गावात पाणी साचल्याने शेताला नदीचे स्वरुप प्राप्त झाले होते. त्यामध्ये सोयाबीन तुर, कपाशी, उडीद, मुंग, भाजीपाला, टमाटे अशा पिकांचे नुकसान झाले असून शिवसेना संपर्कप्रमुख प्रा.नरुभाऊ खेडेकर व युवासेना जिल्हाप्रमुख नंदु कर्हाडे यांनी अतिवृष्टी भागात जावून नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच नुकसानग्रस्त शेतकर्यांना मदत मिळण्यासाठी तत्काळ जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेवून मदत मिळविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगून तसेच सर्व शेतकरीबांधवांना भेट देवून त्यांना धिर दिला.यावेळी शिवसेना नेते संतोष भुतेकर, उपतालुकाप्रमुख किसनराव धोंडगे, बी.टी.म्हस्केसर, सरपंच ज्ञानेश्वर वरपे, उपसरपंच सुनिल वायाळ, राजु मिसाळ, बाजीराव देशमुख, दामुअण्णा शिंदे, समाधान गवते, शेनफड पाटील, उत्तमराव पाटील, पांडूरंग शिंदे, रामप्रसाद सुरुशे, लिंबाजी सुरुशे, शिवप्रसाद आप्पा, कृष्णा भुतेकर, भारत भुतेकर, रऊफभाई, भास्करअण्णा, दिपक पुंगळे, समाधान पाटील, तिर्थराज गवते, पंढरीभाऊ जराळ,विठ्ठलराव शिंदे व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने या पाहणी दौर्यात उपस्थित होते.
Users Today : 23