राज्य परिवहन महामंडळात महिलांना सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दया

Khozmaster
1 Min Read

वाहक महिलांना वर होत असलेला अन्याय दूर करा.चिखली – सरळसेवेतील २०१९ मधील चालक व वाहक महिलांना नियुक्ती मिळणेबाबत माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट घेऊन राज्य परिवहन महामंडळात महिलांना सेवा करण्याची संधी देण्याची मागणी केली असल्याचे रयत क्रांती पक्षाचे राज्य प्रवक्ते प्रशांत ढोरे पाटील यांनी सांगितले.जाहिरात क्र. १/२०१९ सरळसेवा भरती घटक संवर्ग मधील पात्र महिला उमेदवार असून त्यांचे ३०० दिवसाचे वाहन चालन सराव प्रशिक्षण विभागीय स्तरावर पूर्ण झालेले आहेत,परंतु विभागीय स्तरावर सदर उमेदवारांना वाहतुक निरीक्षकांच्या वाहनावर महिला चालक नियुक्ती दिलेली नाही,उमेदवार हे चालक कम वाहक असे दोन्ही ही परवाने असल्यामुळे त्यांची वाहक म्हणून नियुक्ती मिळावी अशी मागणी आहे. तसेच भरतीमध्ये ८००० पदांची तरतुद असतांना ५००० हून अधिक पुरूष उमेदवारांना नियुक्ती मिळाली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात फक्त १५७ महिला असतांनाही त्या महिलांना डावलत आहेत, सदर महिलांवर होत असलेला अन्याय दूर करून त्यांचा सहानभुतीपूर्वक विचार करून त्यांना राज्य परिवहन महामंडळात सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दयावी अशी मागणी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली असून मुख्यमंत्री शिंदे यांनी या संदर्भात तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले असल्याचे रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते प्रशांत ढोरे पाटील यांनी सांगितले आहे.

0 8 9 4 5 6
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *