चिखली: लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या व 17 सप्टेंबर या वाढदिवस ते महात्मा गांधीजी यांची जयंती 2 ऑक्टोबर हा कालावधीमध्ये राज्य सरकारच्या वतीने ” राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता ” सेवा पंधरवाडा म्हणून विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जात आहे. त्या अंतर्गत चिखली तालुक्यात केळवद येथे स्वच्छता अभियान,आंधई- चांदई येथे केले वृक्षारोपण,किन्होळा व एकलारा येथे गरोदर माता व बालक तपासणी शिबिर संपन्न झाले. झालेल्या या स्वच्छता अभियान, वृक्षारोपण आणि गरोदर माता व बालक तपासणी शिबिराला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. मौजे- केळवद येथे स्वच्छता अभियान चिखली तालुक्यातील मौजे- केळवद येथे ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ कार्यक्रमांतर्गत स्वच्छता अभियान रबविण्यात आले. विविध समाजोपयोगी उपक्रमांनी हा पंधरवडा साजरा होत असून मतदारसंघात कार्यकर्ते सक्रियतेने सहभागी झालेले आहेत.या स्वच्छता अभियाना सौ द्वारकाताई भोसले तालुका अध्यक्ष महिला आघाडी,दिगांबर जाधव जिल्हा उपाध्यक्ष किसान आघाडी, सुरेश यंगड सरचिटणीस अनुसूचित जाती जमाती,, बंडू नाना गायकवाड, के. पी. पाटील, संजु पाटील, आशाताई हटकर, मंगला सोळंके, नवले साहेब, जगन्नाथ खोडके, पांडुरंग पाटील, शिवतारे मामा, तुळशीराम पाटील(चाचा ), प्रल्हाद भारोडकर, आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.मौजे आंधई- चांदई येथे केले वृक्षारोपण राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता पंधरवडा’ अंतर्गत उपक्रमःमौजे आंधई- चांदई येथे ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता पंधरवडा’ निमित्त आज 22 सप्टेंबर रोजी वृक्षारोपण केले. या उपक्रमात सिद्धेश्वर तवर, गणेश राणा परिहार उपाध्यक्ष कामगार, श्रीकृष्ण चौथे सरपंच, अंनथा साळोक पोलिस पाटील, संतोषराव साळोक तंटामुक्ती अध्यक्ष, जीवन चौथे शिपाई, विजय जाधव रोजगार सेवक, आत्माराम चोथे, दीपाली मोरे, सौ. पुष्पा चोथे, एकनाथ साळोक माजी सरपंच, मंगला मिरगे, गणेश चोथे, गणेश भुतेकर, सदाशिव साळोक, समाधान मापारी, भारत भुसारी, शेषराव चोथे, श्रीराम बर्हाटे, उमेश शेळके सुभाष गोलांडे, संजय साळोक, मोहन मोरे, योगेश शेळके व इतर गावकरी सहभागी झाले होते. किन्होळा व एकलारा येथे गरोदर माता व बालक तपासणी*,’राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ अंतर्गत शिबिर संपन्नः देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस 17 सप्टेंबर ते महात्मा गांधीजी यांची जयंती 2 ऑक्टोबर हा कालावधी ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ म्हणून माझ्या चिखली विधानसभा मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. याच उपक्रमाअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र किन्होळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्र एकलारा येथे आज गरोदर माता व बालक तपासणी, मातृत्व योजना नोंदणी शिबिर घेतले. या शिबिरात मा. डॉ. मीनाक्षी काळे वैद्यकीय अधिकारी, मा. डॉ. प्रवीण राजपूत यांनी महिलांची तपासणी केली. श्री. श्रीधर घाडगे फार्मासिस्ट, श्री. आर. जी. जायभाये, आरोग्य साहाय्यक, श्रीमती व्ही. पी. वानखेडे आरोग्य साहाय्यिका, श्री. पी. एस. खराटे आरोग्य साहाय्यक यांच्यासह मा. श्री. गजानन सोळंकी, तालुका कोषाध्यक्ष, मा. श्री. अशोक अंभोरे पाटील, मधुकर बाहेकर, गजानन शेळके, संदीप बाहेकर, रमेश बाहेकर, जमीर खान पठाण, अभिजीत राजपूत शिबिरास उपस्थित होते.