बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रमोद देडवे व जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना अकोला जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत निवेदन सादर करण्यात आले जिल्ह्यात पावसाच्या आगमनापासून तर आजपर्यंत पावसाने थैमान घातला आहे संततधार पाऊस अतिवृष्टी व ढगफुटीमुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे शेतकऱ्यांना तिबार पेरणी करूनही हाती अपयश आले आहे ज्या शेतकऱ्याची पिके काही प्रमाणात वाचवल्या गेली होती तीही सप्टेंबर महिन्यात सुरू असलेल्या पावसामुळे पिवळी पडून सर्वच पाण्याखाली बुडालेली आहोत त्यामुळे अकोला जिल्ह्याला ओला दुष्काळ जाहीर करून जिल्ह्यातील सर्व मंडळातील शेतकऱ्यांना सर्व पिकासाठी सरसकट पिक विमा द्यावा तसेच शासन स्तरावरून मिळणाऱ्या मदतीस जिल्ह्यातील सर्वांना पात्र ठरावे शेतकऱ्यांना आज रोजी शासन मदतीची गरज आहे ओल्या दुष्काळामुळे पिकाचे झालेले नुकसान पाहून व शेतीसाठी घेतलेल्या कर्जाला कंटाळून अकोला जिल्ह्यातील अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत शासनाने जर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट सर्व शेतकऱ्यांना मदत जाहीर केली तर या मदतीचा खूप मोठा आधार शेतकऱ्यांना मिळेल व रोज रोजच्या होणाऱ्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मदत होईल निवेदनाची दखल घेऊन जिल्ह्यातील सर्व मंडळातील पिकांना सरसकट पिक विमा शासकीय मदत जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्याल ही अपेक्षा वंचितच्या वतीने व्यक्त केली निवेदन देत्या वेळी महिला प्रदेश महासचिव अरुंधती शिरसाट जिल्हाध्यक्ष प्रमोद देडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे महिला जिल्हाध्यक्ष प्रभा शिरसाट माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा इंगळे जिल्हा महिला महासचिव शोभा शेळके अकोला पूर्व तालुका अध्यक्ष किशोर जामनिक अकोला पश्चिम तालुका अध्यक्ष देवराव राणे शरद इंगोले माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतिभा अवचार ॲड संतोष रहाटे विकास सदाशिव सिद्धार्थ शिरसाट महिला तालुकाध्यक्ष मंगला शिरसाट सुशीला मोहाळ यांनी केले.