उप प्रादेशिक परिवहन विभाग; शिकाऊ अनुज्ञप्ती आता ऑनलाईन अकोला – नागरिकांना शिकाऊ अनुज्ञप्ती काढण्याकरीता उप प्रादेशिक कार्यालयामध्ये जावे लागत असे. परंतु आता शासनाव्दारे फेसलेस सुविधाच्या माध्यमातून घरबसल्या शिकाऊ अनुज्ञप्ती मिळणार आहे. याकरीता नागरिकांनी आपल्या मोबाईलवर, घरच्या संगणकावर, ऑनलाईन सुविधा केंद्रावर ही सुविधा ऊपलब्ध करुन दिली आहे. ज्या नागरीकांचे आधार कार्ड अपडेट असेल (जसे त्यांच्या आधार कार्ड वर जन्म तारीख व मोबाईल क्रमांक अपडेट असल्यास) अशा नागरिकांनी घरच्याघरी शासकीय शुल्क भरुण शिकाऊ अनुज्ञप्ती काढावी. या सुविधेचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन ऊपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी केले.