महाराष्ट्र राज्य प्राथमिक सेना सोयगाव यांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन दिले सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव येथे गट शिक्षण अधिकारी यांना शिक्षक सेनेच्या वतीने विविध प्रकारच्या मागण्यांचे निवेदने देण्यात आले.खालील मागण्या करण्यात आल्या.1 )चटोपाध्याय पात्र शिक्षक बांधवांचे वेतन निश्चिती तात्काळ करणे 2) श्री गाडेकर कनिष्ठ सहाय्यक यांनी पदभार घेताना ताब्यात घेतलेल्या केंद्रनिहाय शिक्षकांची सेवा पुस्तकांची यादी मिळावी 3) ऑफलाइन मागणी केलेले परंतु अद्याप अप्राप्त असलेल्या देयकांच्या मागणी पत्राची यादी शिक्षक सेनेस मिळावी जेणेकरून वरिष्ठ कार्यालयाकडून निधी मिळण्यासाठी संघटना स्तरावरून प्रयत्न करता येईल 4)केंद्रनिहाय सेवा पुस्तिका अद्यावत करण्यासाठी सेवा पुस्तिका कॅम्प आयोजित करणे 5)ऑफलाइन बिलासाठी जी तरतूद प्राप्त आहे त्यातील अनेक शिक्षकांना अद्याप पर्यंत चेक प्राप्त नाहो तरी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सूचना देऊन तो चेक मिळण्यासाठी प्रयत्न करणे 6) सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांच्या सेवा पुस्तिका सहा महिने आधी अद्यावत करण्यासाठी कार्यालयीन कर्मचारी यांना सुचित करणे 7) निवड श्रेणीसाठी आवश्यक असणारे ऑनलाइन प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी आपल्या स्तरावरून वरिष्ठ कार्यालयास पत्रव्यवहार करणे शिक्षण सेवक कालावधी पूर्ण केलेल्या शिक्षकांचे नियमित करण्यासंबंधीचे वरिष्ठ होताच नियमित करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करणे इ मागण्या करण्यात आल्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने कनिष्ठ सहाय्यक गाडेकर यांनी निवेदन स्वीकारले याप्रसंगी शिक्षकसेना तालुकाप्रमुख रवींद्र शेळके कार्याध्यक्ष गिरीश जगताप संपर्कप्रमुख भाऊसाहेब पाटील ज्येष्ठ मार्गदर्शक विजयसिंग राजपूत शिक्षकसेना पदाधिकारी विजय सोनवणे किशोर जगताप संजय सूर्यवंशी आभिमान पाटील अनिल गुप्ता, सुपडू सोनवणे उपस्थित होते