कृषी विभागाच्या उपक्रमातून जामठी येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन सोयगाव प्रतिनिधी ,गोकुळसिंग राजपूत सोयगाव राज्यात दिनांक ०१ सप्टेंबेर २०२२ ते ३० नोव्हेंबेर २०२२ या कालावधीत मराठवाडा व विदर्भ विभागातील शेतकऱ्यांच्या नैराश्य व त्यातून उद्भवणाऱ्या आत्महत्या यावर प्रभावीपणे उपाययोजना करून शेतकरी आत्महत्या होणार नाहीत तसेच बळीराजाला सुखाचे दिवस यावेत याकरिता “ माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी ” या उपक्रमाची सुरुवात प्रत्येक तालुक्यात करण्यात आली आहे त्यानुसार सोयगांव तालुक्यात आज दि.22-09-2022 रोजी मौजे जामठी येथे सोयगाव कृषि विभाग तालुका कृषी अधिकारी एस.जी.वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा पंधरवाडा “माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी”क्षेत्रीय किसान गोष्टी घेण्यात आला. सेवा पंधरवाडा कृषी विभागाच्या विविध योजना विषयी सविस्तर मार्गदर्शन कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ अशोक निर्वळ यांनी सांगितले.व आत्मा यंत्रणा यांचे मार्फत विविध घटकांचे आयोजन करण्यात आले होते.आजच्या कार्यक्रमात प्रामुख्याने महसूल, जलसंधारण, ग्रामविकास, वीज खात्याच्या संदर्भातील अडचणी याबाबत चर्चा, पतपुरवठा व सामाजिक सुरक्षा, तंत्रज्ञान प्रसार, पिक वैविधिकरण तसेच शेतकऱ्यांना मार्केटशी जोडणे या विषयी आवश्यक त्या उपाययोजना याविषयी सरपंच व गावातील प्रगतशील शेतकरी तसेच उपसरपंच यांचेशी चर्चा करून गावचा प्रगतीचा आलेख सुधारण्याविषयी नियोजन करण्यात आले.आजच्या कार्यक्रमात एस. जी. वाघ तालुका कृषि अधिकारी सोयगांव प्रत्यक्ष बांधावर जाऊन कापूस व मका पिकाविषयी माहिती देऊन कृषि विविध योजनांचा लाभ घेण्याविषयी मार्गदर्शन केले.टि. बी.चव्हाण, हेमंत देशमुख कृषि पर्यवेक्षक, एस.एस.पाटील कृषि सहाय्यक यांनी माहिती सांगितली जामठी यांनी कापूस व मका पिकावरील किड व रोग याविषयी करावयाच्या उपाययोजना याविषयी माहिती दिली.यावेळी सोयगाव कृषी विभागाचे कर्मचारी कृषी पर्यवेक्षक अतुल पाटील, ए.एस.बावसकर, कृषी सहाय्यक मानसिंग भोळे(राजपूत),मयूर पाटील,आत्मा बी टी एमचे अमोल महाजन,सोयगांव यांनी शुद्धा मार्गदर्शन केले. गट व प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची माहिती दिली.यावेळी गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.