प्रतिनिधी : रामेश्वर वाढी पातूर : साप कोणताही असो सापाचे नाव काढताच अंगावर काटा उभा राहतो, त्यात अजगर साप ( Python Snake ) दिसताच पाहणाऱ्याची तर बोबडीच वळते. तालुक्यातील आलेगाव गावच्या शेतकरी मिनाबाई गणपत महल्ले यांनी आपल्या शेतातील सोयाबीनचे काम करण्याकरिता मजूर त्यांच्या शेतातील सोयाबीनच्या पिकात एक मोठा साप आढळून आला. सापाला पाहताच तिथून भीतीपोटी मजूर बाजूला झाले थोड्या वेळानंतर त्यांनी परिसरातील वनविभागाशी संपर्क केला असता आलेगाव वनविभागाचे वनरक्षक अविनाश घुगे यांनी घटनास्थळी पोहचून पाहणी केली असता भारतिय अजगर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.वनरक्षक अविनाश घुगे यांनी पातूरचे सर्पमित्र स्वप्निल सुरवाडे, सर्पमित्र अमोल सोनोने,सर्पमित्र संजय बंड यांना दूरध्वनीवरून सापा विषयी माहिती दिली.
सदर माहितीवरून सर्पमित्र स्वप्निल सुरवाडे, सर्पमित्र संजय बंड, सर्पमित्र अमोल,सोनोने,सागर चव्हाण यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्यांनी बिनविषारी प्रवर्गातील अजगर साप (non-venomous Python Snake ) आहे असे सांगितले. दरम्यान अजगराने झोपडी पासून जवळच असलेल्या कंबरेपर्यंत उंच असलेल्या सोयाबीन पिकात आश्रय घेतला लाकडे, गवत , काटे अशी बिकट परिस्थिती आणि त्यात सदर साप हा आक्रमक पवित्र्यात असलेला 8 ते 10 फूट लांब असलेल्या अजगराला ताब्यात घेण्यात अडचणी येत होत्या. मात्र, अर्ध्या तासाच्या मेहनतीनंतर सर्पमित्र स्वप्निल सुरवाडे, सर्पमित्र अमोल सोनोने,सर्पमित्र संजय बंड यांनी अजगराला एका गोणीत पकडून ( Caught python in sack ) ताब्यात घेतले. त्यानंतर तेथील शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला.
सदर अजगर हा आलेगाव वनपरिक्षेत्र वनरक्षक अविनाश घुगे यांच्या उपस्थितीत सर्पमित्र स्वप्निल सुरवाडे,सर्पमित्र संजय बंड,सर्पमित्र अमोल सोनोने,सागर चव्हाण स्वप्निल तेलगोटे यांनी जंगलात सुखरूप सोडला.
अजगर साप नेमका असतो तरी कसा ?
अजगर साप सर्वात लांब साप असून पण तो पूर्णपणे बिनविषारी आहे. हा साप जंगलात, झाडावर तसेच पाणथळ जमीन, खडकाळ जमिनीवरही आढळून येतो. शेतात काम करताना काळजी घ्या. शेत परिसर, माळरान, जंगल हे तर सापांचे घर आहे. त्यामुळे आपल्या शेतात साप आढळल्यास शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी, सापांना इजा करू नये , साप शेतकऱ्यांचा मित्र आहे . शेत परिसरातील साप तेथील उंदरांवर नियंत्रण ठेवतात, पर्यायाने शेतीचे नुकसान टाळले जाते.