सोयगाव सावळदबार .आ रात्रीच्या वेळी निर्वस्त्र फिरत असलेल्या इसमावर लवकरच आळा घालण्यासाठी तरुण मित्र मंडळी व गावकरी सज्ज अफवांनावर विश्र्वास कोणी ठेवू नका; प्रा.जीवन कोलते सोयगाव तालुक्यातील सावळदबारा गावामध्ये काळ्या जादूच्या अफवांना जोर आलेला आहे, सावळदबारा गावांमध्ये रात्रीच्या वेळेस निर्वस्त्र स्त्री फिरत असल्याची अफवा गावामध्ये वाऱ्यासारखे पसरली आणि गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले गावामध्ये बऱ्याच लोकांच्या घरासमोर रात्रीच्या वेळेस कोणीतरी व्यक्ती हळद कुंकू गुलाल टाकून त्यावरती काळी बाहुली लिंबू मिरची टाकत असल्याचे समोर आले परंतु ती व्यक्ती कोण आहे याबाबत अजूनही समजले नाही रात्रीच्या वेळेस गावातील लोक एकत्रित येऊन रात्र-रात्र गावात गस्त घालत असल्याचे दिसून येते मात्र ती स्त्री आतापर्यंत कुणाला दिसली याबाबत समजलेले नाही याबाबत गावांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे, रात्रीच्या वेळेस निर्वस्र स्त्री फिरत असल्याच्या चर्चेला मात्र गावांमध्ये उधाण आलेले आहे, त्यामुळे स्त्रिया आणि लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे सुशिक्षित माणसे ज्या आधुनिक जगात वावरतात त्यामध्येदेखील खडे, भाग्यरत्ने, रुद्राक्ष, अंगठय़ा यांचा वापर, वास्तुशास्त्राप्रमाणे स्वत:च्या घरातील बदल, नारायण नागबळीची पूजा अशा अनेक कृतींद्वारे हेच दाखवून देत आहेत की, अजूनही त्यांच्या मनातील यातुनिर्भर श्रद्धा कायम आहे. याचे एक कारण म्हणजे विश्वातील अनेक गूढं माणसाला उकललेली नाहीत.यासाठीच महाराष्ट्र शासनाने अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कायदा करत असताना श्रद्धा कोणत्या व अंधश्रद्धा कोणत्या यातून वाद निर्माण होऊ नये म्हणून कायद्याचे नाव ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा यांना प्रतिबंध व त्यांचे समूळ उच्चाटन अधिनियम २०१३’ असे केले आहे.अशा अफवांवर विश्र्वास ठेवू नये अशे आवाहन प्रा.जीवन कोलते(सामाजिक कार्यकर्ते)यांनी गावातील लोकांना आव्हान केलेला आहे की अशा आफवांना बळी पडू नये तसेच अशी घृणास्पद कृत्य करणारी व्यक्ती अथवा स्त्री असेल त्यानीही लक्षात घ्यावे अशी कोणत्याही प्रकारची पूजा,विधी,कर्मकांड करून कोणालाही मुलं बाळ किंवा इतर कोणत्याही प्रकारचा धन लाभ अथवा आर्थिक फायदा होत नाही परीणामी स्वतःची इज्जत व जीव टांगणीला टाकून अश्या व्यक्ती गावात भीतीचे वातावरण पसरवीत आहे परिणामी लहान मुले व महिला भगिनी आणि गावकऱ्यां मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अशा अफवा पसरविणाऱ्यावर व अशी कृत्ये करणाऱ्या कायदेशीर कारवाई करण्यासाठी फर्दापूर पोलीस व अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांना कळविले असून लवकरच त्यासाठी गोपनीय माध्यमातून माहिती घऊन सदर व्यक्तीबद्दल व कृत्य करणाऱ्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येईल यांची काळजी घ्यावी.व अश्या कृत्यांना लककर आळा घालावा म्हणून त्यासाठी आता गावांतील तरुण मित्रमंडळी व गावकरी आता एकवटले आहे अशी माहिती देण्यात आली
Live Tv
Advertisement
Polls
मौसम का हाल
Latest news
Live Scores
Rashifal
Panchang