डॉ राजेश्वर उबरहंडे रायपूर: चिखली विधानसभा मतदार संघात आरोग्य सुविधांची वानवा आहे. चिखली विधान सभा मतदार या अगोदर संघात कुठेही चांगल्या आणि दर्जेदार आरोग्य सुविधा निर्माण केल्या गेल्या नाही . परंतू आ सौ श्वेता ताई महाले पाटील आमदार झाल्यापासून त्यांनी चिखली विधान सभा मतदार संघातील चिखली आणि बुलडाणा तालुक्यात आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी सतत धडपडत आहेत. त्या आमदार झाल्यापासून रायपूर आणि उदयनगर प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणी वर्धन करुन ग्रामीण रुग्णालय बनविण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. या रायपूर , उदयनगर प्राथमिक आरोग्य केंद्रा सोबतच त्यांनी चिखली ग्रामीण रुग्णालय येथे त्यांच्या आमदार निधितुन त्यांनी रुग्णवाहिका दिल्या . धाड ग्रामीण रुग्णालय येथे एक कोटी रुपयांचा ऑक्सिजन प्लांट उभारला . चिखली ग्रामीण रुग्णालय 50 ऐवजी 100 बेडचे रूग्णालय व्हावे यासाठी प्रयत्न करीत आहेत. यामुळे आ सौ श्वेता ताई महाले पाटील या चिखली विधान सभा मतदार नागरिकांचे आरोग्य सुदृढ रहावे यासाठी आरोग्य सुविधा मजबूत करीत असल्याचे प्रतिपादन डॉ राजेश्वर उबरहंडे यांनी रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे झालेल्या गरोदर माता व बालक तपासणी शिबिरात केले.
दि 23/9/2022 रोजी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस 17 सप्टेंबर ते महात्मा गांधीजी यांची जयंती 2 ऑक्टोबर हा कालावधी ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ म्हणून आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांच्या संकल्पनेतून चिखली विधानसभा मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे.
राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ अंतर्गत रायपूर येथे गरोदर माता व बालक तपासणी शिबिर तर एकलारा येथे विविधतेतून एकता हा कार्यक्रम संपन्न झाला.
माता सशक्त असतील तरच देशाचे भविष्य असलेली बालके सुदृढ होतील या उद्देशाने आज 23 सप्टेंबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र रायपूर येथे ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ अभियानांतर्गत गरोदर माता व बालक तपासणी तथा मातृत्व नोंदणी अभियान राबवण्यात आले.
यावेळी डॉ. राजेश्वर उबरहंडे सर व डॉ. सौ. उबरहंडे मॅडम यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी पंचायत समिती सदस्य संदीपभाऊ उगले, रायपूरचे सरपंच श्री. सुनीलभाऊ देशमाने, स्त्री-रोग तज्ज्ञ डॉ. सावजी सर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सरपाते, वैद्यकीय अधिकारी डॉ. तायडे, डॉ.उस्मान, शंकर तरमाळे, रेहान संजरी, खलील अहमद, किसन मांडवगडे, कैलास आहेर, गोविंद हनवते, बापू देशमुख, विलास आहेर, नीलेश राजपूत, रमेश देशमाने, आशिष जयस्वाल, सर्व आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा व प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावांमधील गरोदर महिला या कार्यक्रमास उपस्थित होत्या.एकलारा येथे विविधतेतून एकतेचे मनोहारी दर्शन ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’अंतर्गत उपक्रमः
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस 17 सप्टेंबर ते महात्मा गांधीजी यांची जयंती 2 ऑक्टोबर हा कालावधी ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ म्हणून माझ्या चिखली विधानसभा मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे.
याच उपक्रमाअंतर्गत विवेकानंद विद्यालय एकलारा येथे विविधतेतून एकता हा कार्यक्रम आज घेण्यात आला. या वेळी भारतभूमीतील प्रादेशिक वैविध्याला एकाच सांस्कृतिक धाग्याने कसे घट्ट बांधून ठेवले आहे याचे मनोहारी दर्शन घडवण्यात आले.
या कार्यक्रमात अंकुशराव पाटील भाजपाचे ज्येष्ठ नेते, गजानन सोळंकी, तालुका कोषाध्यक्ष भाजप, अशोक अंभोरे पाटील, अनमोल ढोरे तालुका उपाध्यक्ष भाजपा, बद्रीनाथ पानगोळे तालुका उपाध्यक्ष भाजपा, रमेश आकाळ तालुका सरचिटणीस भाजपा, प्राचार्य श्री. एल. के. बारापात्रे सर, पर्यव़ेक्षक एस. एस. गव्हले सर, बि एस बारहाते सर श्री पिवटे सर ,ईटोकर सर, श्री. हिवरकर सर यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
Users Today : 8