प्रतिनीधी रवि मगर-देऊळगाव राजा नॅशनल दलीत मुव्हमेंट फाॅर जस्टीजची निवेदनाव्दारे मागणी तालुक्यातील मंडपगाव येथील ग्रामसेवक अनिल वैद्य यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून विद्यमान न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करत सुभाष निवृत्ती मोरे यांना जातीय व्देषभावनेतून आर्थिक मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी सखोल चौकशी करून कायमस्वरूपी बडतर्फ करणे बाबत नॅशनल दलीत मुव्हमेंट फाॅर जस्टीज बुलडाणा जिल्हयाच्या वतिने जिल्हाधिकारी बुलडाणा यांना तहसिलदार देऊळगाव राजा यांच्या मार्फत निवेदण देण्यात आले.सविस्तर असे की, पीडीत सुभाष निवृत्ती मोरे यांनी मधुकर त्र्यंबक दांडगे (देशमुख) यांच्याकडून त्यांच्या मालकीची ग्रामपंचायत हद्दीतील मालमत्ता क्रमांक 134 ही जागा खरेदी खताने विकत घेतली तेव्हापासून आज पर्यंत कोणत्याही प्रकारची हरकत सदर जागेवर घेण्यात आलेली नाही. परंतु मधुकर त्रंबक दांडगे हे मयत झाल्याने त्यांचे वारसदार गोपाल मधुकर दांडगे यांनी खोट्या नाट्या तक्रारी व हरकती ग्रामपंचायतला दिल्या त्या तक्रारीच्या अनुषंगाने ग्रामसेवक अनिल वैद्य यांनी वारंवार बेकायदेशीररित्या नोटीस दिल्यामुळे सुभाष निवृत्ती मोरे यांनी वि. न्यायालय देऊळगाव राजा येथे सदर जागेचे बांधकाम करण्यासंदर्भात परवानगी मागितली होती. त्यानुसार वि.न्यायालयाने सुभाष मोरे यांना बांधकाम करण्याचे आदेश नमुद संदर्भ क्र.1 नुसार दिलेले असताना ग्रामसेवक अनिल वैद्य यांनी संदर्भ क्रमांक 2 नुसार कर्तव्यात कसूर करून बेकायदेशीर रित्या नोटीस देऊन विद्यमान न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करून राजकीय दबावापोटी नाहक त्रास देत आहे.तसेच सदर प्रकरणात गोपाल दांडगे यांच्या त्रासापोटी सुभाष मोरे यांनी पोलीस स्टेशन देऊळगाव राजा येथे दिनांक 17/7/2022 रोजी तक्रार दिली असता पोलीस स्टेशन देऊळगाव राजा यांनी ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार व विविध कलमान्वये गोपाल दांडगे व इतर नऊ यांच्यावर कायदेशीर कारवाई केलेली आहे परंतु सदर कारवाई ला न जुमानता परत ग्रामसेवक व इतरांच्या माध्यमातून खोट्या तक्रारी देऊन मानसिक व आर्थिक छळ करत आहेत. अनिल वैद्य ग्रामसेवक हे 24 तास नशे मध्ये असून नशेमध्ये कर्तव्यावर असतात यांचे मेडिकल सुद्धा करण्यात यावे. अकार्यक्षम ग्रामसेवक अनिल वैदय यांची सखोल चौकशी करण्यात येऊन त्यांना कायमस्वरूपी बडतर्फ करण्यात येऊन ॲट्रॉसिटी ॲक्ट व इतर विविध आरोप पत्र दाखल करण्यात यावे अन्यथा नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीज बुलडाणा जिल्ह्याच्या वतीने लोकशाही मार्गाने तहसील कार्यालय देऊळगाव राजा येथे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा निवेदनाव्दारे देण्यात येऊन सदर प्रकरणाची सखोल चौकशी होउन न्याय न मिळाल्यास भविष्यात मंडपगाव येथे बहुचर्चीत खैरलांजी हत्याकांडाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तवीण्यात आली आहे. यावेळी नॅशनल दलीत मुव्हमेंट फाॅर जस्टीज चे जिल्हा अध्यक्ष प्रशांतभैया डोंगरदिवे, जिल्हा कार्याध्यक्ष मनोज इंगळे, ता.अ.दे.राजा रविंद्र कासारे, ता. उपाध्यक्ष संजय कदम, पीडीत सुभाष मोरे, लता मोरे हे उपस्थीत होते.
Users Today : 8