सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगांव तालुक्यातील वरखेडी खु येथे सेवा पंधरवाडा कार्यक्रम दि. २३/०९/२०२२ रोजी कृषि विज्ञान केंद्र येथील शास्त्रज्ञ अशोक निर्वळ, टी.बी.चव्हाण, तालुका कृषि अधिकारी एस.जी.वाघ, कृषि पर्यवेक्षक ए.जे.पाटील, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक ए.एस.महाजन, कृषि सहाय्यक ए.एस.बावस्कर व गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील प्रगतिशील शेतकरी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी विविध पिकातील किड व रोग नियंत्रण याविषयीची माहिती टी.बी.चव्हाण विषय विशेषज्ञ के.व्हि.के, औरंगाबाद, अशोक निर्वळ विषय विशेषज्ञ के.व्हि.के, औरंगाबाद, यांनी फळबागेतील किड व रोग तसेच विविध उपाययोजना याविषयीची माहिती दिली, तालुका कृषि अधिकारी एस.जी.वाघ कापूस मुल्यसाखळी प्रकल्प याविषयी माहिती दिली, कृषि पर्यवेक्षक ए.जे.पाटील यांनी एम.आर.ई.जी.एस फळबाग लागवड व ठिबक सिंचन योजना याविषयी माहिती दिली, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक ए.एस.महाजन यांनी शेतकरी गट संघटन व प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना याविषयी माहिती दिली, कृषि सहाय्यक ए.एस.बावस्कर,कृषी सहाय्यक मानसिंग भोळे(राजपूत), यांनी महाडीबीटी योजना, विविध प्रकारचे सापळे वापरणे याविषयी माहिती दिली. तसेच नितेश राजपूत यांच्या साबण बनविण्याच्या प्रकल्पास सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी भेट देऊन माहिती जाणून घेतली.
Users Today : 28