सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथील मोहित संतोष जाधव वय १७ हुतात्मा स्मारकनगर फर्दापूर हा महाविद्यालयीन तरुण जनावरांना पाणी पाजण्यासाठी धुंदर शिवार या साठवण पाझर तलावात गेला असता त्याचा अचानक पाण्यात बुडून दि.२३/९/२२ शुक्रवारी रोजी मृत्यू झाला. या मृत्याच्या घटनेमुळे सपूर्ण गावात शोककळा पसरली होती.सदर घटनेची माहिती फर्दापूर पोलीस ठाण्यात मिळताच सपोनि देविदास वाघमोडे व पोलीस कर्मचारी यांनी पाझर तलावाकडे तात्काळ धाव घेतली आणि गावातील नागरिकांच्या मदतीने चार ते पाचच्या दरम्यान त्याला धरणातून बाहेर काढून सोयगाव ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेले असता सोयगाव ग्रामीण रुग्णालयचे डॉ. श्याम गायकवाड यांनी मोहित जाधव यास तपासून मृत घोषित केले. या घटनेची नोंद फर्दापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. घटनेची माहिती योगेश खडके यांनी दिली असून, पुढील तपास सपोनि सपोनि देविदास वाघमोडे यांच्या मार्गदर्शनखाली नीलेश लोखंडे आदी पोलीस कर्मचारी तपास करीत आहेत…
Users Today : 27