सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा;महेशसिँह ठाकूर सावळदबारा परीसरात : कपाशी पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव , शेतकरी चिंतेत नाना प्रकारचे किटक नाशक ठरतात निष्फळ नदी नाले अजूनही वाहत आहेत!शेतकऱ्यांना मात्र पाऊसा थाबण्याची प्रतीक्षा….सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यात व सावळदबारा परिसरात पावसाळा सुरू होऊन तीन महिने उलटले तरीही परिसरात आजही पावसाने रोज रोज हजेरी असते लावल्याने रोगराईने पिकांवर थैमान घातले आहे. विविध खते औषधी वापरूनही शेतात ओल कायम आहे ऐन दाने भरणीत आलेले मकाचे पीक हातातून जाण्याच्या मार्गावर आहे. परिसरात गेल्या दहा दिवसांपासून दररोज झिमझिम पाऊस पडत राहिला . या पावसाने पीक स्थिती उत्तम असली तरी पानथळ काळपोटीच्या जमिनीला मोठा धोका निर्माण झाला आहे. तर ऐन भरणीत आलेल्या मकाच्या पिकासाठी लागणार नसल्याने मकाचे पिक येणार की जाणार हा मोठा पेच शेतकऱ्या पुढे उभा राहिला आहे. मक्का अमेरिकन अळीने, कापूस ,रोगाने थैमान घातल्याने उत्पन्नात कमीत कमी पन्नास टक्के या प्रमुख पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर जुलैमध्ये पावसाने जोरदार साथ दिल्याने सप्टेंबरच्या पंधरवडय़ा पर्यंत पिकांची उत्तम स्थितीत होते. जरी मुंग , उडीद , या मालाला योग्य भाव नसला तरी शेतकऱ्यांच्या तोंडावर चैतन्य दिसायचे परंतु, ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात पावासाने जोरदार हजेरी लावली दिल्याने हातातोंडाशी आलेली प्रमुख पिके पाण्यात जाण्याच्या मार्गावर असल्याने शेतकऱ्यांची कंबरडे मोडले आहे. सततच्या दमट गरम वातावरणामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. याशिवाय कापूस तूर मका या पिकांवर कीड रोगांचे आक्रमण झाले आहे. त्यामुळे परिसरातील पिके धोक्यात आली आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता शासनाने कृषी विभाग आणि तलाठ्यांमार्फत परिसरातील पिकांचे तातडीने सर्वेक्षण करण्याची मागणी पुढे येत आहे. शासनाने तातडीने सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकर्यांना भरपाई द्यावी, अशी अपेक्षा शेतकरी सोनू ठाकूर देव्हारी हे व्यक्त करीत आहेत.गेल्या आठ दिवसांपासून रिमझिम पाऊस तर कधी केवळ ढगाळ वातावरण असल्याने खरिपातील कापूस, मका पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झालाने उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहे. सावळदबारा परिसरातील देव्हारी, नादातांडा, टिटवी, मोलखेडा, चारुतांडा, घाणेगांव तांडा, डाभा,जामठी आदि गावातील शेतकऱ्यांनी जेमतेम पाण्यावर पूर्व हंगामी कापूस व मका पिकाची लागवड केली आहे. मात्र कपाशीला ऐन फूल पाते व कैर्या लगडण्याची व विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची वेळ एक झाली आहे. दरम्यान कपाशी पिकावर थ्रीप्सने हल्ला चढविला आहे, तर त्याचबरोबर पांढरी माशी, मवा, फुलकिडे आणि तुडतुड्यांचा प्रादुर्भाव झाला आहे. नाना प्रकारच्या किटक नाशकांटी फवरणी करूण सुद्धा काहीच उपयोग होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. कृषी विभागाने मार्गदर्शन उपयोजना सुचवाव्यात अशी मागणी शेतकरी करीत आहे.महसूल विभाग व कृषी विभागाने पंचनामा करावा.कधी ढगाळ वातावरण तर कधी रिमझिम पाऊस सुरू आहे. त्यामुळे कपाशी पिकावर मोठ्या प्रमाणावर थ्रीप्स आले आहे, शेतकरी बांधव थ्रीप्स रससोषक किडीचा नायनाट करण्यासाठी एक हजार रूपये किमातीचा प्रतिपंप खर्च करीत आहे. तरी प्रशानाला याची जाणीव नसते ही एक दुर्दैवी बाब आहे. सोयगाव तालुक्यात सर्वात मोठे गाव म्हणून सावळदबारा व फर्दापूर लौकिक आहे. त्याठिकाणी जर आपण कमी पडत असाल तर इतर खेड्यापाड्याचा विचार न केलेला बराच ! ओम कृषी सेवा केंद्र तथा शेतकरी सोनू ठाकूर देव्हारी ता सोयगाव