सतीश मवाळ मेहकर तालुक्यातील कोयाळी या गावात लम्पी रोगाचे लसीकरण व्यवस्थित पार पाडण्यात आले.सगळीकडे लम्पि या रोगाविषयी भयानक भीतीचे वातावरण पसरले असून पशुपालक प्रचंड घाबरत आहेत.यामुळे लसीकरणाची मागणी ही सातत्याने होत होती. यामध्ये पशुधन विस्तार अधिकारी डॉ.हरीश ठाकरे यांनी संपूर्ण तालुक्यात लासिकरांचे आदेश दिले आणि पशुैद्यकीय दवाखाना श्रेणी -२ देऊळगाव माळी अंतर्गत येणाऱ्या सर्वच गावामधे लसीकरण मोहीम सुरू झाली. कोयाळी या गावामधे उत्तम प्रतिसाद गावकऱ्यांनी दिला.आणि जवळ जवळ १००% गाव लसीकरण मुक्त झाले.या लासिकरण मोहीम मध्ये सरपंच खोकले ,ग्रामसेवक ,डॉ.विभुते ,डॉ.झोरे, व गावकरी यांनी कठीण प्रयत्न घेतले.सर्व पशुपालकांनी या मोफत लसीकरण मोहीम लाभ घ्यावा अशी मागणी सर्वत्र होत आहे.आणि पशुपालकांना कुठलीही अडचण आल्यास तत्काळ पशुैद्यकीय दवाखाना दे.माळी यांना कळवावे.
Users Today : 8