सोयगांव तालुक्यातील जामठी येथे कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांचे मार्फत क्षेत्रीय किसान गोष्टी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यात प्रामुख्याने खरीप पिकातील कापूस, मका व सोयाबीन पिकातील किड व रोग व्यवस्थापन तसेच रब्बी हंगामपूर्व प्रशिक्षण याविषयी माहिती देण्यात आली.यावेळी विविध पिकातील किड व रोग नियंत्रण तसेच कामगंध सापळ्याचा वापर याविषयीची माहिती टी.बी.चव्हाण विषय विशेषज्ञ के.व्हि.के, औरंगाबाद, अशोक निर्वळ विषय विशेषज्ञ के.व्हि.के, औरंगाबाद, यांनी रब्बी हंगाम नियोजन याविषयीची माहिती दिली, तालुका कृषि अधिकारी एस.जी.वाघ कापूस मुल्यसाखळी प्रकल्प याविषयी माहिती दिली, कृषि पर्यवेक्षक ए.जे.पाटील यांनी एम.आर.ई.जी.एस फळबाग लागवड व ठिबक सिंचन योजना याविषयी माहिती दिली, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक ए.एस.महाजन यांनी शेतकरी गट संघटन व प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना याविषयी माहिती दिली, कृषि सहाय्यक एम.आर.भोळे यांनी महाडीबीटी योजना, विविध प्रकारचे सापळे वापरणे याविषयी माहिती दिली. आजच्या कार्यक्रमात गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व गावातील प्रगतिशील शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ए.एस.बावस्कर कृषि सहाय्यक धनवट यांनी केले.