प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार -: धडगाव तालुक्यातील खडक्या प्रकरणात हलगर्जीपणाचा ठपका ठेवत नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ बी . जी शेखर पाटील यांनी तत्कालीन पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षकांवर निलंबनाची कारवाई केली आहे . धडगाव तालुक्यातील खडक्या येथे २७ वर्षीय विवाहित महिलेवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिच्या कुटूंबियांनी केला आहे.यात त्यांच्याकडे मयत महिलेशी झालेले शेवटच्या संभाषणाची ऑडिओ क्लीप असल्याचा दावा करण्यात येत आहे . असे असतांना संबंधित पोलीस निरीक्षकांनी दुर्लक्ष केली असून अशा पोलीस अधिकाऱ्यांची बदली नको तर निलंबन करण्यात यावे , अशी मागणी भाजपा प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या सह सर्वपक्षीय नेत्यांनी केली होती . या प्रकरणात नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ बी . जी शेखर पाटील यांनी तत्कालीन पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षकांवर निलंबनाची कारवाई केली आहे . पिडीत मुलीच्या बापाने तिच्यावर बलात्कार होवुन तिची हत्या झाल्याचा आरोप केला होता . या प्रकरणी जे . जे रुग्णालयात पिडीताच्या कुटुंबीयांच्या मागणी नुसार पुर्न शवविच्छेदन देखील झाले असुन या प्रकरणात न्याय वैद्यकीय अहवालाची प्रतिक्षा कायम आहे . या प्रकरणात आधी दोन पोलीस अधिकारी आणि चार पोलीस कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली होती . मात्र नियंत्रण कक्षातील बदली नव्हे तर यातील दोषींवर निलंबणाच्या कारवाईची चित्रा वाघ आणि सर्वपक्षीय नेत्यांनी मागणी केली होती . त्या नंतर या प्रकरणात हलगर्जीपणाचा ठपका ठेवत तत्कालीन पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे आणि उप पोलीस निरीक्षक बी . के महाजन यांना निलंबीत करण्यात आले आहे .
Users Today : 28