प्रतिनिधी प्रा. भरत चव्हाण नंदुरबारज्यनिअर कॉलेज येथे नंदुरबार जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे सभेचे आयोजन करण्यात आले होते सभेत वाढीव पदांना मान्यता व अनुदान द्यावे आयटी शिक्षकांना पद मान्यता देऊन अनुदान द्यावे नोव्हेंबर 2005 पूर्वी व नंतर सेवेत आलेले शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, अंशतः अनुदानित विनाअनुदानित जुनिअर कॉलेज व तुकड्या शंभर टक्के अनुदानित करण्यासाठी महासंघाने प्रयत्न करावेत सातव्या वेतन आयोगानुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच प्रगती आश्वासित योजना दहा वीस तीस वर्षानंतर मिळणारी वेतनश्रेणी शिक्षकांना लागू करावी, निवड श्रेणी सर्वांना सरसकट द्यावी ,सातव्या वेतन आयोगाचा फरकाचा दुसरा व तिसरा हप्ता लवकर जमा करावा, विद्यार्थी संख्येची अट शिथिल करावी, यासह महत्वाच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली.संघटन शक्ती खूप महत्त्वाची आहे. संघटनेत खूप ताकद आहे संघटने मुळेच आपल्यावर कुठलाच अन्याय होत नाही असे प्रतिपादन संघटनेचे जिल्हा सल्लागार व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा राजेंद्र शिंदे यांनी कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांचा सहविचार सभेत केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाध्यक्ष प्रा एस एन पाटील, कार्याध्यक्ष प्रा उमेश पाटील , सचिव प्रा जी एन सोनवणे, जिल्हा समन्वयक प्रा बबनराव बागुल उपस्थित होते पुढे बोलताना शिंदे म्हणाले संघटनेत कार्य करण्याची सुरुवात यापूर्वी 33 वर्षा अगोदर केली होती. आज बरोबर 23 सप्टेंबर रोजी संघटनेच्या कार्यालयात 33 वर्षे पूर्ण होत आहे एवढ्या मोठ्या कालावधीत एक कार्यकर्ता तालुका ,अध्यक्ष ,जिल्हाध्यक्ष ते विभागीय अध्यक्ष एवढी पद भूषविली संघटनेत कार्य करताना स्वतःला झोकून द्यावे लागते पदाची कुठल्याच प्रकारची अपेक्षा न व्यक्त करता सातत्याने कार्य करत रहा असे आव्हान उपस्थितांना त्यांनी केले . संघटना ही कुण्या एका व्यक्तीवर चालत नसते, संघटना ही सेवाभावी संस्था आहे संघटनेत माणसे येतात आणि जातात परंतु संघटना मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांची आवश्यकता असते. महाराष्ट्रात कनिष्ठ महाविद्यालय संघटना ही एकमेव अशी संघटना आहे जिच्या शाखा कुठेच नाहीत संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव संघटित संघटना आहे. जिल्हा कार्यकारिणी सहविचार सभेत जिल्हाध्यक्ष प्राध्यापक एस एन पाटील यांनी महासंघाच्या बैठकीचे इतिवृत्त तसेच वर्षभरात जिल्हा कार्यकारिणीने केलेले कार्य याच्या आढावा व माहिती सभेत दिली सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देऊन समाधान केले. सभेत प्रा, बबन बागुल प्रा, प्रशांत बागुल प्रा ए एम वाळवी, प्रा राजेंद्र साळुंखे, प्रा आसीफ शहा, प्रा बाळासाहेब हुंबरे,प्रा हेमंत चौधरी, प्रा.स्वप्नील महाजन प्रा.भावसार यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सचिव प्रा जी एन सोनवणे यांनी केले तर आभार प्रा भरत चव्हाण यांनी मानले सहविचार सभेत नंदुरबार अक्कलकुवा ,तळोदा , शहादा, धडगाव नवापूर येथील जिल्हा कार्यकारणी सदस्य मोठ्या संख्यने उपस्थित होते