प्रतिनिधी प्रा. भरत चव्हाण नंदुरबार नवरात्र उत्साह साजरा करण्यासाठी शहरातील म्हाळसा मंदिरात जय्यत तयारी सुरू झाली असून त्याचे नियोजन झाले आहे शहरातील मध्यवर्ती भागात असलेले व अल्पकाळात प्रसिद्धीस आलेले म्हाळसा मातेचे मंदिर आहे. आई म्हाळसा मातेची स्थापना होवून आता पौर्णिमेस तीन वर्ष पूर्ण होतील . म्हाळसा देवी हे संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा यांच्या धर्मपत्नी होत . म्हाळसा देवी ही बाराबलूतेदार समाजाची कुलेवता आहे ज्यात कलाल, सोनार, कुणबी पाटील, माळी, शिंपी सोनार अश्या विविध जातींचा समावेश आहे . नंदुरबार जिल्ह्यात आई म्हाळसा देवी चे मंदिर नव्हते. कुलदेवतेचा दर्शनासाठी भाविक व सेवेकरी बंधू भगिनींना चंदनपुरी, जेजुरी अश्या ठिकाणी दर्शना साठी जावे लागायचे . भाविकांची सोय शहादयात झाल्याने समाधान झाले व्यक्त होत आहे . मातेची दर पौर्णिमा व आमावस्येला आंघोळ घालण्यात येवून विधीवत पूजा केली जाते रोज साडी बदलली जाते सकाळी साडे आठ व सायंकाळी आठ वाजता नैवद्य आरती होते. प्रत्येक महिन्यात पौर्णिमेला सेवेकरी बंधुकडून भंडारा देण्यात येतो भंडारा नियोजन हे ठरलेले असते व त्यांची यादी तयार असते. नवरात्र पौर्णिमेस आई म्हाळसा देवीची स्थापना झाली होती या नवरात्र पौर्णिमेस आई म्हाळसा देवीची स्थापना होवून तीन वर्ष होता आहेत आईचा तो वाढदिवस असतो म्हणून त्यादिवशी मोठ्या भंडार्याचे नियोजन करण्यात आले असून नवरात्र दरम्यान मातेस फुलोरा लावण्यात येतो . नवरात्रीत काकड आरती पहाटेस करण्यात येते . भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. अष्टमीस होम हवन करण्यात येते . नवसाला पावणारी माता म्हणून आई म्हाळसा मातेची ख्याती झाली असून तशी प्रसिद्धी देखील मिळाली आहे. रात्रीचा वेळी गरबा नियोजन करण्यात आले असून रात्रीस विविध क्षेत्रातील मान्यवरांचा हस्ते महाआरतीचे नियोजन करण्यात येते . नवरात्रीचे नवू विविध रंगांचा साड्यानी मातेची सजावट केली जाते . मातेचे हे रूप विलोभनीय असून सर्वांना आपलेसे वाटणारे आहे . मंदिर परिसर व मातेची पूजा आरती नियोजनासाठी मंदिर समितीचे अध्यक्ष प्रा गणेश नारायण सोनवणे, उपाध्यक्ष डॉ विजय कलाल, सचिव गणेश सोनवणे , कार्याध्यक्ष विलास जावरे, खजिनदार स्वप्नील पाटील सहसचिव वकील पाटील, सदस्य अजय सोनवणे, निलेश सोनार, विद्या सोनवणे, संगीता कलाल, ऋषीकेश प्रकाशकर, निलेश शिंपी, गिरीश जावरें, भटू जव्हेरी, डॉ लक्ष्मण सोनार, प्रा बाळू मराठे, प्रवीण शिंपी मेहनत घेत आहेत.