शहरातील वरली किंग च्या वरली अड्ड्यावर पोलिसांची मोठी कारवाई 29 जनाविरुद्ध गुन्हा दाखल

Khozmaster
2 Min Read

चिखली शहरातील वरली किंग च्या वरली अड्ड्यावर पोलिसांची मोठी कारवाई रुपरेलिया पिता पुत्रासह 29 जनाविरुद्ध गुन्हा दाखल.झाला असून बुलढाणा अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने हि कारवाई केली.असे म्हटले जायचे “खेलना हो वरली तो चले आओ चिखली” त्याचे कारण ही तसेच आहे ज्याप्रकारे इतर व्यवसायिकांची दुकाने असतात ना! त्या प्रमाणे चिखली शहरात वरली मटक्याची दुकाने सर्रासपणे सुरू असतात. चिखली शहर हे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात वरली हब म्हणून प्रसिद्ध आहे. आणि हीच बाब स्थानिक पोलीस प्रशासनाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण करून सर्वसामान्य जनतेच्या मनात पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलीन करणारी आहे.ठाणेदार ते एलसीबी या ठिकाणी फक्त काहितरिथातुर मातुर कारवाई करून आपले कर्तव्य पार पाडत असल्याचे मागील रेकॉर्ड वरून सिद्ध होत आहे. इतकेच नव्हे तर मागील काही महिन्या अगोदर काही पत्रकारांनी चिखली शहरात सुरू असलेल्या वरलीच्या दुकानांचे चित्रीकरण करून चिखली येथील सर्रासपणे सुरू असलेल्या वरली मटक्याचे खरे वास्तव जनतेसमोर आणले होते. आणि त्यावेळी ठाणेदार अशोक लांडे यांनी आपण किती कर्तव्यदक्ष आहे हे दाखवण्यासाठी मागील कारवायांचा पाडा वाचला होता. आणि एलसीबीने थोडी अधिक कारवाई सुद्धा केली होती. मात्र इतक्या कारवाया करून ही चिखली येथील वरली मटका बंद का होत नाही असे प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. कारण मलिदा खाण्यात गुंग असणाऱ्या स्थानिक पोलिसांना काही दिसतच नव्हत.अशातच 22 सप्टेंबरच्या सायंकाळी बुलढाणा अप्पर पोलीस अधीक्षक श्रावण दत्त यांच्या पथकाने चिखली शहरात सुरू असलेल्या वरली मटका अड्ड्यावर धडक कारवाई करत शहरात विविध ठिकाणी वरलीचे आकडे लिहिणारे 27 जणांना ताब्यात घेत त्यांच्या जवळून दहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. यात चार प्रिंटर, 40 मोबाईल, 12 दुचाकींचा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे चिखली शहरात वरली किंग म्हणून प्रसिद्ध धीरू रूपाली लिया व त्यांचा मुलगा मेहुल रूपालीया हे दोघे फरार झाल्याची माहिती असून चिखली ठाण्यात या दोघे पिता-पुत्रासह एकूण 29 जनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती पथक प्रमुख पंकज सपकाळे यांनी दिली आहे.

 

0 8 9 4 7 8
Users Today : 8
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *