सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगांव तालुक्यातील तितूर येथे सेवा पंधरवाडा कार्यक्रम दि. सोयगाव कृषी विभागाच्या वतीने तालुका कृषि अधिकारी एस.जी.वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला , यावेळी कृषि पर्यवेक्षक एच बी देशमुख यांनी नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना, पिक विमा व नुकसान भरपाई, इ पिक पाहणी याविषयी शेतकरी व ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक ए.एस.महाजन यांनी शेतकरी गट संघटन व प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना याविषयी माहिती शेतकऱ्यांना दिली, कृषी सहाय्यक मानसिंग राजपूत,कृषि सहाय्यक एल टी साळवे यांनी महाडीबीटी योजना, पि एम कि सा न e kyc, कीड व रोग याविषयी माहिती दिली यावेळी गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Users Today : 27