कार्यालय प्रतिनिधी, मेहकर तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्याची दुरावस्था झाली आहे याच अनुषंगाने दिनांक 12 ऑगस्ट 2022 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मेहकर, यांना बरटाळा, शिवपुरी ,पारडा ,चोंडी, बदनापूर, कळपविहीर ,हा रस्ता अत्यंत खड्डेमय झालेला आहे त्यामुळे रस्त्याने जाणे येणे करताना नागरिकांना तसेच वाहन चालकांना खूप त्रास होत आहे व मोठा अपघात होण्याची शक्यता आहे विशेष करून ऑटो चालवीत असताना खड्डे चुकविण्याचे नादात समोरून येणाऱ्या वाहनास अपघात होऊ शकतो म्हणून आपण आपल्या स्तरावर खड्डे बुजविण्याचे काम लवकरात लवकर सुरू करावे अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन दिले होते आंदोलनाच्या धास्तीने रस्त्याचे काम सुरू करण्यात आले म्हणून रस्त्याने जाणे येणे करणाऱ्या सर्व नागरिकांनी आनंद व्यक्त केला याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मा. तालुकाध्यक्ष गजानन सावंत, ग्रां. प. सदस्य गोपालभाऊ नाडे, संतोष भाऊ गायकवाड ,संदीप भाऊ सावंत, शालिग्राम सावंत, अशोकराव सुरुशे, संतोष भाऊ मेटांगळे, भगवानराव अंभोरे ,गजानन सावंत ,शंकरराव गायकवाड, बंडूभाऊ बाजड, व इतर नागरिक हजर होते .
Users Today : 8