नांदुरा प्रतिनिधी (शुभम ढवळे) : मुली शिकल्या व सुशिक्षित झाल्या आपल्या स्वकर्तृत्वावर त्या स्वावलंबी बनून प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवीला, मात्र तरीही आज मुलींची सुरक्षा म्हणजे काळाची गरज भासू लागली आहे, त्यासाठी मुलींनी आपल्या सुरक्षेसाठी इतरांवर अवलंबून न राहता स्वतः आपली सुरक्षा करणे फार गरजेचे आहे. *कु.गायत्री डवंगे* ही इयत्ता नववी मधील विद्यार्थीनी हिने *स्टेट लेव्हल च्या टँग-सू-डू चॅम्पियन शिपमधे विजयी होऊन* ट्रॉफी व मेडल मिळाल्याबद्दल आज शुक्रवार दि. २३/९/२०२२ *कु. गायत्री चा सत्कार शिवसेना नांदुरा शहर* यांच्याकडून घेण्यात आला आहे. याआधी देखील गायत्रीने तीन राज्यस्तरीय कराटे स्पर्धांमध्ये विजयी होऊन पदक मिळवले आहे. समाजामधील इतर मुलींनी देखील गायत्रीकडून प्रेरणा घेऊन आपल्या स्वरक्षणासाठी प्रशिक्षण घेऊन स्वरक्षण करावे असे आवाहन शिवसेना नांदुरा शहराच्या वतीने करण्यात आले. तसेच कु. गायत्रीचे अभिनंदन करून तीला पुढील वाटचालीस शुभेच्छा वं आशीर्वाद दिले.तसेच तिच्या आई वडील यांचा पण त्यात सिंहाचा वाटा आहे म्हणून त्यांचा सुद्धा सत्कार करून तुमच्या सोबत आम्ही आहोत असे आश्वासन शिवसेना नांदुरा शहराच्या वतीने देण्यात आले. यावेळी_
_श्री. अनिलभाऊ जांगळे, शिवसेना शहर प्रमुख नांदुरा,_
_सौ. सरिता बावस्कार_
_शिवसेना महिला आघाडी शहरप्रमुख नांदुरा,_
_श्री.महादेवभाऊ सपकाळ,_
_उपशहरप्रमुख शिवसेना नांदुरा,संजय मेहसरे उपशहर प्रमुख शिवसेना,राज सुसरे युवा सेना शहर प्रमुख,शुभम ढवळे व इतर शिवसैनिक उपस्थित होते._