सोयगांव गोकुळसिंग राजपूत सोयगाव माजी सभापती धरमसिंग चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश सोयगांव तालुक्यासह सावळदबारा परिसरातील पशुपालक त्रस्त झाले असून त्या पशुपालकांना तात्काळ प्रशासनांनी मदत करुन सर्व गावातील जनावरांना लम्पी स्क्रीन आजाराची लस देण्याची मागणी सोयगाव पंचायत समितीचे माजी सभापती धरमसिंग चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली होती.या लम्पीच्या भितीने पशुधन पालक, शेतकरी धास्तावले असून सोयगाव तालुक्यातील सर्व गावात सरसगट जनावरांना लम्पीस्क्रिन प्रतिबंधक लस देण्यात यावी अशी मागणी सोयगाव पंचायत समितीचे माजी सभापती धरमसिंग चव्हाण यांनी प्रशासनाकडे केली होती.प्रशासनाला दिलेल्या निवेदनात ते म्हणतात की, मागील काही दिवसापासून सर्वत्र जनावरांना लम्पीस्क्रिन आजाराची लागण झालेली दिसून आली होती. अनेक जनावरांना या आजाराची लागन झाल्याने पशुधन मृत्यूमुखी पडत असल्यामुळे सर्व सामान्यसह पशुधन पालक व शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन औरंगाबाद विभागाने तात्काळ लस देऊन सोयगाव तालुक्यातील सर्व गावातील जनावरांना सरसगट लसीकरण करण्याचे दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे त्यांच्या निवेदनानुसार जिल्हा प्रशासनाने तात्काळ तालुका पशुवैद्यकीय अधिका-यांना आदेश देऊन लसीकरण करण्यात यावे असे सांगितले असल्याची माहिती माजी सभापती धरमसिंग चव्हाण यांनी सांगितले आहे.सदरची मागणी ही माजी सभापती धरमसिंग चव्हाण यांनी तालुक्यात सरसगट लम्पी लस देण्यात यावी अशी केली आहे. पशुपालक व स्कीन प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिम कोरोना काळातही गावोगावी जाऊन जनजागृती करुन राबविण्याची मागणी पशुपालक व शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली होती सोयगाव तालुक्यात हा आजार झपाट्याने पसरू नये म्हणून जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने यासाठी प्रशासकिय स्तरावर केली होती. वास्तविक जिल्ह्यात व राज्यात लसीचा तुटवडा असतानाही नांदातांडा येथे लसीकरण कँम्प ठेवण्यात आला आहे. आणि सावळदबारा परिसरात सर्वत्र लसीकरण चालू आहे.औरंगाबाद जिल्हयाला सर्वाधिक लस उपलब्ध करून घेतली आहे.जिल्हयात ७५ टक्के जनावरांचे लसीकरण करून लम्पी आजाराचा प्रसार होण्यापूर्वीच प्रशासनाने दखल घेतली होते. तातडीची उपाय योजना म्हणून जिल्हयात खबरदारीचा उपाय म्हणून लसीकरणावर भर देण्यात आला सर्व जनावरांना सरसगट लम्पी स्कीन प्रतिबंधक लस देण्यात यावी अशी मागणी माजी सभापती धरमसिंग चव्हाण यांनी केल्यांनंतर.प्रशासन खडबडून जागे झाले व या मागणीची दखल घेत जिल्हा परिषदेने सरसगट लसीकरण करण्यात यावे असे पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांना करण्याचे आश्वासन दिल्याने पशुपालकांमधून संबंधीत सोयगाव तालुका स्तरावरील यंत्रनेबाबत आनंद व्यक्त होत आहेजर माजी सभापती धरमसिंग चव्हाण यांनी आम्हा पशु पालकांच्या तक्रारीची दखल घेतली नसती तर आज सोयगांव तालुक्यात हे लम्पीचे लसीकरण झालेच नसते असे शेतकरी बोलत आहे.यावेळी सोयगाव तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ विनोदकुमार चव्हाण,तालुका पशुधन विकास अधिकारी जी.एस.लांडगे, यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. काकाडे ,शिपाई कंगले,प्राव्हेट डॉ चोपडे यांनी चांगल्याप्रकारे लसीकरण मोहीम राबवित आहे माजी सभापती धरमसिंग चव्हाण यांनी साप्ताहिक आपले ज्ञानपंखचे प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत यांच्याशी बोलताना सांगितले.