सोयगांव तालुक्यातील टिटवी-पळसखेडा येथे आयडीया,एअरटेल,जिओवडाफोन कंपनीच्या सेवेचे अक्षरशः वाजले बारा

Khozmaster
2 Min Read

सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपुत सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथून जवळच असलेल्या टिटवी गावात सावळदबारा येथे आयडीया ऐरटेल,वडाफोन कंपनीचा टाॅवर असुनही या टिटवी-पळसखेडा गावात फोर्जी रेंज इंटरनेट चालवण्यासाठी पुरेशी मिळत नसल्याने या परिसरातील रहिवाशी अक्षरशः त्रस्त झाले आहेत.तसेच या अतिदुर्गम भागात रेंज देखील पोहचत नाही तर अडी-अडचणीच्या वेळी नातेवाईकांशी संपर्क साधला जात नसल्याने येथील नागरिक हैराण झाले आहेत.  सोयगाव या तालुक्याच्या ठिकाणापासून साठ ते सत्तर किलोमीटरवर अंतरावर आणि सावळदबारा हे मोठे गाव असून या गावाच्या तीन किलोमीटर अंतरावर मोलखेडा, देव्हारी, नादातांडा व इतर वस्त्या आहेत या परिसरात मोबाईलचे टावर असून सुद्धा मोबाईल सेवेचे तिन-तेरा वाजल्याचे चित्र दिसत आहे. या परिसरात मोबाईलवर पुर्ण रेंज दाखवत असतानाही फोन न लागणे,लागलाच तर तो काही सेकंदात कट होणे,समोरुन बोलणा-या माणसाचा आवाज न येणे,आवाज आलाच तर तो गुंतत गुंतत ऐकु येणे,खरखर आवाज येणे,इंटरनेट ओपन न होणे,नेटवरील फाईल डाऊनलोड न होणे,युट्यूब वर बफरिंग दाखवणे,इंटरनेटला अपेक्षीत स्पिड न मिळणे,फोरजीची रेंज मोबाईलवर दाखवत असली तरी नेट सुरु न होणे अशा विविध समस्यांना या आदिवासी अतिदुर्गम भागातील ग्राहकांना सामोरे जावे लागत असल्याचे नागरिक चिंता व्यक्त करत आहेतआपले सरकार महा-ई सेवा केंद्र टिटवी या गावात असून रेंज नसल्याने शेतकऱ्यांना केंद्रात आल्यानंतर तासन तास टातकळ उभे राहावे लागते तरी शासकीय कामाची वेबसाईट गावामध्ये चालत नाही यावेळी सरपंच संध्याताई भागवत जाधव, उपसरपंच, ग्रामसेवक एस.जी.काळे,भागवत जाधव, संदीप जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते.गावांमध्ये,आयडीया,एअरटेल,जिओ,बीएसएनल आदी कंपन्या सेवा देतात.वैयक्तिक स्पर्धेमुळे सर्वच कंपन्यांनी आपले काॅलिंग व नेटचे पॅक मोठ्या प्रमाणावर कमी केले आहेत.आपल्या गावात ज्या कंपनीचा टाॅवर आहे तीच सेवा घेण्यासाठी लोक आग्रही असतात

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *