प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत खोट्या अफवांवर विश्र्वास ठेवू नका,नवरात्र उत्सव शांततेत साजरा करा;सपोनि देवीदास वाघमोडे सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथील पोलीस ठाण्यात नवरात्र उत्सव निमित्ताने शांतता कमेटीची बैठक घेण्यात आली.येत्या २६/९/२२ रोजी घटस्थापना व दुर्गादेवीची स्थापना होऊन नवरात्र उत्सवास प्रारंभ होत आहे. याचबरोबर ५ ऑक्टोंबरला दसरा उत्सव, दिनांक ६ व ७ ऑक्टोंबर रोजी दुर्गा देवीच्या मुर्तीचे विसर्जन, ९ ऑक्टोंबर रोजी कोजागिरी पोर्णिमा आणि ईद ए बिलार आदी सण साजरे होत आहेत. या विविध धार्मिक उत्सवाच्या काळात.सोयगाव तालुक्यातील व फर्दापूर, सावळदबारा परिसरातील प्रत्येक नागरीक शांतता व सलोख्याला नेहमीप्रमाणे प्राधान्य देऊन परस्पराचा आनंद द्विगुणीत करा.या बैठकीत दुर्गा उत्सव फर्दापूर हद्दीतील पोलीस पाटील, सर्व दुर्गा मंडळाचे सदस्य, पोलीस मित्र,जेष्ठ नागरिक उपस्थित होते. बैठकीमध्ये दुर्गा उत्सव व नवरात्र उत्सव शांततेत व शासकीय नियमानुसार साजरा करा.कोणत्याही प्रकारच्या खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका अशे मार्गदर्शन पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास बाळासाहेब वाघमोडे यांनी केले.ध चा म करु नका मुले पळविणारी टोळी आली या अफवांवर विश्र्वास ठेवू नका संशय असल्यास तात्काळ फर्दापूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा विनाकारण कोणाला मारहाण करून कायदा हातात घेऊ नका नवरात्र उत्सव शांततेत साजरा करा.खोट्या अफवासाठी त्यासाठी आम्ही इथं बसलो आहे अशी माहिती उपनिरीक्षक रणजित कासले यांनी सांगितले.खोटे मेसेस प्रसारित होत असल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची ग्रामस्थांनी काळजी घ्यावी. अशा प्रकारे सर्व सुचना शांतता कमेटीच्या बैठकीत सपोनि देविदास वाघमोडे यांनी दिल्या यावेळी सर्व नवरात्र उत्सव समितीचे अध्यक्ष, उपध्याक्ष, सदस्य,सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नागरिक पोलीस स्टेशनचे सर्व मान्यवर व इतर मान्यवर सदस्य उपस्थित होते.