सावळदबारा येथील कँशिअर रत्नाकर हुंबरे यांची राजकीय दबाव मुळे डायरेक्टरने केली बदली

Khozmaster
2 Min Read

सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत मध्यवर्ती बँकेचे कॅशीयर हुंबरे यांची बदली रद्द करा;महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अरुणभाऊ चव्हाण देशमुख यांची मागणी सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील मध्यवर्ती बँकेमध्ये कार्यरत असलेले कॅशियर रत्नाकर आसाराम उंबरे यांची कै राजकीय पोटी राजकीय लोकांचा काम न केल्यामुळे यांच्याकडून थेट वरिष्ठ कार्यालयात संपर्क साधून त्यांच्यावर राजकीय दवाब आणून डायरेक्टरने त्यांची बदली करण्यात आली.हि बदली पुन्हा सावळदबारा शाखेत करण्यात यावी अशी मागणी भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अरुणभाऊ चव्हाण यांनी केली आहे. अगोदरच इकडे ग्रामीण भाग असल्याने कर्मचारी येत नाही. आला तर आठ,दहा महिन्यात त्यांची बदली करण्यात येते.कर्मचारी तो तर दिवटी कोठे पण करु शकतो परंतु मुलांच्या शिक्षणाचे काय त्यांच्या शिक्षणाचे आथिर्क नुकसान होते. याचा विचार वरिष्ठ कार्यालयाने केला पाहिजेत. काही पुढाऱ्या लोकांच्या काम न केल्यामुळे माझी बदली करण्यात आली आहे परंतु या परिसरात राजकीय लोकांचा जो एकुल चालेल बँकेत त्यांचे काम होणार नाही ऐकल्यास त्यांची बदली करण्यात येते असा मनमानी कारभार या सर्कलमध्ये काम करताना कर्मचाऱ्यांनी अनुभव घेतला आहे. परिसरात कोणताही कर्मचारी काम पोटी दबावाखाली काम करायचं ऐकल्यास वरिष्ठांना फोन जाणार मग मंत्री आमदार खासदार यांच्यामार्फत आमची बदली करण्यात येते सरकारी माणूस कसं काम करायचं हा प्रश्न अधिकारी नसतो पण शेवटी इलाज नसतो शासनाचा हात धोरण असेल आम्हाला मान्य आहे परंतु काही काम खराब केले असतो बदली करा कोणाचे दबावापोटी बदली करू नका असे भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीचे म्हणणे आहे आणि मध्यवर्ती बँकेचे कँशिअर रत्नाकर उंबरे अशे निवेदन वरिष्ठ कार्यालयात पाठविण्यात आले आहे. याप्रंसगी समितीचे पदाधिकारी जिल्हा सरचिटणीस संदीप मानकर महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष सौ.अंजनाताई राधाबाई झलवार तालुका अध्यक्ष महिला आघाडी सिल्लोड ोयगाव तालुका अध्यक्ष गोकुळसिंग राजपूत, जिल्हा उपाध्यक्ष शेख फिरोज राजाराम पाटील पालोदकर सिल्लोड तालुका अध्यक्ष शेख,फारुख,जब्बार डी.तडवी व प्रा.जीवन कोलते(सामाजिक कार्यक्रर्ता),उपसरपंच मो.आरिफ मो.लुखमान सावतबारा गावातील अनेक नागरिक उपस्थित होते निवेदन देतेवेळी उपस्थित होते.

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *