चिखली येथे फार्मासिस्ट डे निमित्त जेष्ठ व महिला फार्मासिस्टचा सत्कार आव्हानांना तोंड देऊन फार्मासिस्टची वेगळी ओळख निर्माण करू – प्रशांत पाटील चिखली – दि २५ सप्टेंबर रोजी जागतिक फार्मासिस्ट दिना निमित्त शहरातील जेष्ठ फार्मासिस्ट बांधव व महिला फार्मासिस्ट यांच्या सत्काराचे आयोजन चिखली शहर केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आले होते, भारत सोडून जागतिक स्तरावर फार्मासिस्ट या प्रोफेशनला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त असून फार्मासिस्ट हा तेथील आरोग्य यंत्रणेचा मुख्य भाग म्हणून त्याच्याकडे बघितले जाते. वैद्यकीय कार्यात कार्यरत असलेल्या चिकित्सा करणाऱ्या डॉक्टर एवढेच महत्व त्यावर औषध निर्माण करून त्या औषधाचे डोस ठरवणाऱ्या फार्मासिस्टला अत्यंत महत्त्वाचा समजल्या जात, परंतु भारतात आपल्या फार्मासिस्ट बांधवाची अवस्था आपल्या आरोग्य यंत्रणेमध्ये सदैव तृतीय किंवा चतुर्थ श्रेणीमध्ये गणल्या जात आहे. सुरुवातीपासूनच जे कायदे कानून व सन्मानाचा दर्जा फार्मासिस्ट प्रोफेशनला भेटायला पाहिजेत तो भेटला नसल्यामुळे या सेवाभावी मेडिकल प्रोफेशन कडे बघण्याचा सर्वांचं दृष्टिकोण केवळ व्यवसायिक स्वरूपातील औषध विक्रेते म्हणूनच बघितले जाते,त्यामुळे आपले जे फार्मासिस्ट बांधव शैक्षणिक क्षेत्रात कार्य करून, आपल्या अध्ययनामुळे दरवर्षी हजारो फार्मासिस्ट तयार करतात ते फार्मसिस्ट त्याचबरोबर रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये सायंटिस्ट फार्मासिस्ट म्हणून
औषध संशोधनाचे कार्य अविरतपणे करत आहे,रिसर्च फार्मसिस्ट त्याचबरोबर टेक्नॉलॉजी ट्रान्सफर मध्ये जो डाटा विविध चाचण्यातून संशोधनातून तयार होऊन औषध उत्पादन कंपनीमध्ये हस्तांतरित करण्यासाठी जे आपले टेक्नॉलॉजी ट्रान्सफर फार्मसिस्ट कार्य करत असतात, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर फार्मसिस्ट त्यांना औषध उत्पादन कंपनी मध्ये औषधी तयार करण्यासाठी मदत करणारे कॉलिटी आशुरन्स फार्मासिस्ट,क्वालिटीकंट्रोल फार्मसिस्ट, मायक्रोबायोलॉजी फार्मसिस्ट,प्रोडक्शन फार्मसिस्ट, रेग्युलेटरी अफेअर फार्मासिस्ट व जी औषध तयार झालेली आहे त्या औषधाची संपूर्ण माहिती डॉक्टरांना देणारे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह फार्मासिस्ट त्या औषधीचे प्रमाणबद्ध व योग्य पद्धतीने वाटप करणारे गव्हर्मेंट फार्मासिस्ट व रिटेल फार्मासिस्ट त्याचबरोबर हॉस्पिटल मध्ये समुपदेशन करणारे फार्मासिस्ट बांधव त्याचबरोबर हे औषधीेचे मॅन्युफॅक्चरिंग पासून रिटेल पर्यंत होणारा प्रवास यावर बारकाईने लक्ष ठेवणारे प्रशासकीय अन्न व औषध प्रशासनाचे कर्तव्यदक्ष फार्मसिस्ट अधिकारी एवढ्या सर्व बहुआयामी क्षेत्रात कार्य करणाऱ्या फार्मासिस्ट आजही शासन-प्रशासन तसेच व्यावसायिक दृष्ट्या वंचितच आहे.
त्याचे सर्वात मोठे उदाहरण आपल्या जिवाची पर्वा न करता, कोरोना महामारी च्या कार्यात अविरतपणे सेवा देणारे वेळप्रसंगी त्या आजाराने ग्रस्त होऊन काही फार्मसिस्ट बांधवांनी आपला जीव सुद्धा गमावलेला आहे,त्या फार्मासिस्ट बांधवाला सरकारने ज्या कोरोना योद्धा म्हणून, ज्यांनी त्या काळात कार्य केले त्यांना सन्मानित करण्यात आले त्या लिस्टमध्ये वरीलपैकी कुठलाही फार्मासिस्ट बांधवांचा साधा नामोल्लेख न होणे ही सर्व फार्मासिस्ट बांधवांच्या आत्म चिंतनाचा विषय असून, कदाचित आम्हीच आमच्या फार्मसिस्ट प्रोफेशन कोडे नकारात्मक दृष्टीने बघत असल्यामुळे लोक आम्हाला सुद्धा त्या दृष्टीने तर बघत नाही ना असा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे, फार्मासिस्ट डे निमित्य सर्व विविध क्षेत्रातील फार्मासिस्ट क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या, सर्व फार्मासिस्ट बांधवांनी सर्वात आधी आपल्या डोक्यातून काढून टाकावे की मला डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हायचं होतं परंतु मार्क कमी पडल्यामुळे मी नाईलाजाने या प्रोफेशन मध्ये आलो आहे,
प्रत्येकाने आपली वेगळी ओळख निर्माण करावी जेणेकरून, लोकांचाही दृष्टीकोण आपल्याकडे सकारात्मकपणे होईल, त्याचबरोबर आपण सर्व मिळून केंद्र व राज्य शासनात बसलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपल्या प्रोफेशन कडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा आपल्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आपला आवाज उठवण्यासाठी आपले प्रश्न मांडण्यासाठी सर्व फार्मसिस्ट बांधवांनी आपल्या व्यवसायाकडे सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे गरजेचे असल्याचे मत नांदुरा येथील अभ्यासु फार्मासिस्ट विजयजी डवंगे यांनी व्यक्त केले,चिखली येथील जेष्ठ फार्मासिस्ट राजेंद्र व्यास यांनी फार्मासिस्ट बांधवांनी आपल्यातच व्यवसायिक स्पर्धा न करता एकत्रित व्यवसाय करावा असे मत व्यक्त केले,प्रकाशजी मेहत्रे यांनी तरुण फार्मासिस्ट यांनी फार्मासिस्ट क्षेत्रात होत असलेल्या बदला विषयी चिंता व्यक्त केली, बुलढाणा जिल्हा केमिस्ट संघटनेचे सहसचिव प्रशांत ढोरे पाटील यांनी येणाऱ्या आव्हानां तोंड देऊन फार्मासिस्ट या प्रोफेशनला वेगळी ओळख कशी निर्माण करता येईल यासाठी शासन दरबारी सर्वतोपरी प्रयत्न करू असे सांगितले यावेळी जेष्ठ फार्मासिस्ट प्रकाश मेहत्रे,राजेंद्र व्यास,जनार्दन घुबे,रामुसेठ समदानी, प्रकाश जाधव,सुबोध सराफ,संतोष लद्धा,हनुमान भवर,चांडक, अब्दुला पठाण सौ मनीषा भुते,ज्योती पांनगोळे,ज्योती खंडागळे यांच्या सत्कारसह वसंत भोजवाणी,विजय सावन्त मेरेकर,संजय गुंजकर,नीरज लद्धा, सर्जेराव भुते आदींना शुभेच्छा दिल्या याप्रसंगी बुलढाणा जिल्हा केमिस्ट संघटनेचे सहसचिव प्रशांत ढोरे पाटील,जिल्हा सदस्य विनोद नागवणी,चिखली केमिस्ट शहराध्यक्ष स्वप्नील तायडे,जिल्हा प्रतिनिधी जयंत शर्मा,सुनिल पारसस्कर,शहर उपाध्यक्ष बद्री पानगोळे,सहसचिव सूचित भराड,सदस्य भारत खंडागळे आदींची उपस्थिती होती.