हरबरा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याने १६ शेतकऱ्यांना ३० लाखांनी गंडविले .

Khozmaster
3 Min Read

प्रतिनिधी ,  ता . चिखली :अंढेरा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल.  – गेल्या काही महिन्यापूर्वी असोला येथील एका सोयाबीन व्यापाऱ्याने परिसरातील शेकडो शेतकऱ्यांना करोडो रुपायांनी गंडवून फरार झालेला आहे त्याच बरोबर आता हरबरा मालाचा जास्तीचा मोबदला देतो असे म्हणून १६ शेतकऱ्यांची ३० लाखाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला.अशा प्रभाकर संपत हूसे रा डीग्रस बु यांच्या तक्रारी वरून अंढेरा पोलीसांनी आरोपी प्रताप श्रीराम बोरूडे (आडत्या) वय ४५ वर्षे रा विरसांवगी ता मेहकर यांच्या विरुध्द २३ सप्टेंबर रोजी विविध कलमाद्वारे फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे .   सविस्तर असे की गेल्या काही महिन्यातपुर्वी असोला येथील वहिद खान दिलावर खान या सोयाबीन व्यापाऱ्याने अंत्री खेडेकर , मेरा खुर्द , असोला दे घुबे येथील शेकडो शेतकऱ्यांकडून वाढीव रकमेचे आमिष दाखवून चार कोटी रुपयांचा सोयाबीन माल खरेदी करुन फरार झाला मात्र आजपर्यत सापडला नाही त्याच बरोबर आता शेतकरी प्रभाकर संपत हूसे रा डीग्रस बु यांनी अंढेरा पोलीस स्टेशनला तक्रार दिली की, दि. २२ जुलै २०२१ रोजी माझा हरभरा वजन ३० क्विंटल ५५ किलो प्रती भाव ५१०० रुपये प्रमाणे एकूण रुपये १ लाख ४५ हजार २०० चा माल आरोपी नामे प्रताप श्रीराम बोरुडे रा. वीरसावंगी ता. मेहकर यांना दिला व त्यांनी दि २२ जुलै २०२१ रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचा चेक दिला.आणि सांगितले की सदरचा चेक हा तुम्ही दोन महिन्या नंतर बँक मध्ये जमा करा . ठरलेल्या करारा प्रमाणे दिलेला चेक दि ४ ऑक्टोबर २०२१ रोजी चिखली अर्बन बँक शाखा देऊळगाव मही येथे जमा केला होता. परंतु व्यापाऱ्याच्या खात्यात पैसे जमा नसल्याने सदरचा चेक बाऊन्स झाला त्यामुळे व्यापाऱ्याला मोबाइल फोन करून सांगितले की तुम्ही दिलेला चेक बाऊन्स झाला आहे..तुम्ही मला माझे मालाचे पैसे कधी देणार याबाबत विचारणा केली असता व्यापाऱ्याने उडवा उडविचे उत्तर देऊ लागला.आणि काही दिवसानंतर मोबाइल फोन करून टाकला त्यामुळे आपली फसवणूक केली असे समजले हा प्रकार गावात माहीत होताच गावांतील अनेकजण समोर आले आणि आपली फसवणुक झाली नाही ना असे म्हणून त्यांनी व्यापाऱ्याला फोन लावला असता फोन बंद असून गावातून पसार झाल्याचे समजले . त्यामुळे या व्यापाऱ्याने गावातील आनखी १६ शेतकऱ्यांकडून ५८० क्विंटल ५८ किलो रुपये २९ लाख ४६ हजार ७९६ रुपयांचा हरभरा माल विकत घेवून त्याचे सुध्दा चेक बाऊन्स झाल्याने सर्वांनी पोलीस स्टेशनला धाव घेवून फसवणूक केल्याची तक्रार शेतकरी प्रभाकर संपत हूसे रा डीग्रस बु यांनी अंढेरा पोलीस स्टेशनला दिली .अशा तक्रारी वरून ठाणेदार हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली डायरी अमलदार यांनी २३ सप्टेंबर रोजी आरोपी प्रताप श्रीराम बोरूडे (आडत्या) वय ४५ वर्षे रा विरसांवगी ता मेहकर यांच्या विरूध्द कलम ४०६ ,४०९ ,४२०, भादवी नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून तपास दुय्यम ठाणेदार मनोज वासाडे , कैलास उगले, खारडे, शिरसाट , गजानन वाघ , मोरर्शिंग राठोड , सुरेश गवई , विलास काकड , पोफळे, समाधान झीने, सोनकांबळे , यांनी तपास हाती घेतला आहे .

0 6 6 8 3 8
Users Today : 14
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

17:46