पंकजाताई च्या नेतृत्वातला खरादसरा मेळावा

Khozmaster
3 Min Read

तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे  देउळगाव राजा भक्ती गडावर होणाऱ्या दसरा मेळ्यात सहभागी व्हा दसरा मेळावा म्हणजे राज्यातील च नव्हे तर देशातील अठरा पगड जातीतीलप्रेरणा स्थळ आहे या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून विचारांचें सोने लुटलं जात असे..ऊसतोड कामगारांची, दसरा मेळावा ताकद आहे राजकारणात विस्तापीत असलेल्या कार्यकर्त्यांची , दसरा मेळावा आशा आहे वंचीत गरीब, कष्टकरी, शेतकरी, शेतमजुरांची. या सर्वांना बळ देण्यासाठी, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी, दसरा मेळावा असल्याचे बोलल्या जात असे या ठिकाणी स्व गोपीनाथ मुढे मार्गदर्शन करायचे मात्र त्यांचा निधनानंतर गडा च्या कन्या व माजीग्राम विकास मंत्री ना पंकजा मुंढे मार्गदर्शन करायचे मात्र या ठिकाणी होणारा दसरा मेळावा ला महंत नामदेव महाराज शास्त्री यांनी विरोध केला त्यामुळे मागील काही वर्षी पासून दसरा मेळावा हा भगवान बाबा यांचे जनस्थान असलेल्या सावरगाव येथील भक्ती गड या ठिकाणी 5 ऑक्टोबर रोजी होऊ घातला आहे या मध्ये सहभागी होण्याचे आव्हान दसरा मेळावा कृती समितीचे अध्यक्ष डॉ सुनील कायदे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले आहे    या वेळी डॉ सुनिल कायदे यांनी संगितले की गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी राज्याच्या व देशाच्या राजकारणात आपल प्रस्थ निर्माण केल, विस्तापीतांना साहेबांनी बळ दिल, मोडुन पडलेल्यांना उभ केल, ज्यांच्यावर साहेबांचा वरदहस्त होता त्यांना हात लावण्याची हिंमत कोणात नव्हती, साहेबांच्या शिवाय पोरकी झालेले उसतोड कामगार कडे कोणाचेही लक्ष नव्हते त्यांचे अस्तीत्व शुन्यच होते मात्र साहेबांनी त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष दिले, त्यांना संघटीत केले, त्यांचे अनेक प्रश्न धसास लावले आज सर्वच पक्षाच्या जाहीरनाम्यात, सभांमध्ये ,कार्यक्रमामध्ये उसतोड कामगारांचा उल्लेख पाहायला मिळतो, हेच उसतोड कामगार वर्षभर वाट पाहतो दसरा मेळाव्याची, पुर्वी आपल्या मुडे साहेबांची अन आता पंकजाताई मुंडे यांची…त्यांना धीर देण्यासाठी तुमच्या प्रश्नाबाबतीत मी मागे हटणार नाही, तुमचे हक्क मिळवुन देईन हा विश्वास देण्यासाठी गरज आहे दसरा मेळाव्याची. …. स्व गोपीनाथ मुंडे साहेबांनी एकुन राजकीय जीवनात फार कमी काळ सत्तेत घालवला, सत्तेच्या पुर्वी व सत्तेच्या नंतरही सर्वसामान्य जनतेचे अश्रु पुसण्यासाठी सदैव तत्पर असलेला हा नेता होता , म्हणुनच जनतेन त्यांना लोकनेता पदवी दिली.गारपीट असो, अतिवृष्टी असो, पुरपरस्थीती असो, कुठे अन्याय -अत्याचार झालेला असो ,साहेब हजरच असायचे त्यांचे अश्रु पुसण्यासाठी त्यांना धीर देण्यासाठी, हाच गरीब कष्टकरी, शोषीत, वंचीत समाज, शेतकरी, शेतमजुर ज्यांना साहेबांनी अनेक संकटात धीर दिला, त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली, प्रसंगी आर्थीक मदत केली .त्यांना आताही आशा आहे पंकजा ताईसाहेब तुम्ही दसरा मेळाव्यातुन त्यांच्या प्रश्नावर बोलाल …त्यांना आधार द्याल .या आशेवर असतात पंकजाताई यांच मार्गदर्शन ऐकावे असें आव्हान डॉ सुनील कांयदे यांनी केले.

 

0 6 6 8 3 8
Users Today : 14
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

17:46