प्रतिनिधी
प्रा. भरत चव्हाण
नंदुरबार
नंदुरबार जिल्ह्यात दुर्गम भागात आदिवासी उपयोजनक्षेत्रात कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी गेल्या 12-13 वर्षापासून विनाअनुदानित तत्वावर अंशतः अनुदानावर प्रामाणिकपणे ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला, आश्वासन दिली परंतु मागण्यांची पूर्तता मात्र केली नाही. यासाठी नंदुरबार जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री व नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विजयकुमार जी गावित यांची भेट घेऊन आपले प्रश्न मांडले आपल्या नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी उपयोजन क्षेत्रात अनेक वर्षापासून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक शिक्षकेतर बंधू-भगिनी विनावेतन ,अंशत: वेतनावर आपलं कर्तव्य पार पाडीत आहेत मिळेल त्या वेळेत सुट्टीच्या दिवशी मिळेल ते काम, मजुरी करून आपला चरितार्थ चालवीत आहेत. सध्याची परिस्थिती बिकट व हलाकीची झालेली आहे या पवित क्षेत्रात काम करणारे शिक्षक अनेक समस्यांनी त्रस्त झालेले आहेत त्यांचे निराकरण करून शंभर टक्के अनुदान मिळवून द्यावे अशी विनंती निवेदन देऊन करण्यात आली. याबाबत सकारात्मक चर्चा झाली न्याय मिळवून देण्यासाठी नामदार मंत्री प्रयत्नशील आहेत यावेळेस नंदुरबार जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा. एस एन पाटील’ मार्गदर्शक सल्लागार प्रा राजेंद्रजी शिंदे, जिल्हा सहसचिव प्रा. भरत चव्हाण, नंदुरबार तालुका अध्यक्ष प्रा. प्रशांत बागुल प्रा राजेंद्र माळी व पदाधिकारी उपस्थित होते.