आरोग्यमंत्री ना.तानाजी सावंत यांचे डॉ.शशिकांत खेडेकरांना आश्वासन.
सविस्तर…
दत्ता हांडे,देऊळगावराजा – तालुक्यातील सिनगाव जहाँगीर गाव राजकीयदृष्ट्या महत्वाचे व ग्रामीण भागामधून मोठे गाव म्हणून जिल्हाभरात ओळख असलेल्या सिनगाव जहाँगीर येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन व्हावे अशी या परिसरातील नागरिकांची गेली 25 ते 30 वर्षांपासूनची मागणी आहे.त्यानुसार स्थानिकांनी
सन 1995/96,2008,2011मध्ये केलेल्या मागणीनुसार रीतसर प्रस्ताव जिल्हापरिषदेकडून राज्य आरोग्य विभागाकडे दाखल करूनही स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे सन सिनगावला राज्य आरोग्य विभागाच्या आराखड्यातून वगळण्यात आल्याने आरोग्य केंद्र मंजुरीचा प्रस्ताव रद्द करण्यात करण्यात आला होता. त्यानंतर खडकपूर्णा प्रकल्प बाधित सिनगाव जहाँगीर सह चार/पाच गावे प्रकल्पाच्या साठवलेल्या पाण्याच्या काठालगत वसलेले असल्यानं या गावांमध्ये विविध आजारांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आढळतो म्हणून येथील समाजिक कार्यकर्ते संतोष पाटील बंगाळे यांनी सन 2015 मध्ये महायुतीचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस सरकाराकडे शिवसेनेचे तत्कालीन स्थानिक आमदार मा.डॉ.शशिकांत खेडेकर साहेब यांच्या माध्यमातून तत्कालीन आरोग्यमंत्री डॉ.दिपकजी सावंत यांच्या मंत्रालयातील दालनात प्रत्यक्ष भेट घेऊन प्रकल्पबाधित नवीन पुनर्वसित सिनगाव येथे नवीन आरोग्य केंद्राची स्थापण्याची आवश्यकता लक्ष्यात आणून दिली असता त्यानुसार मंत्री महोदयांनी आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांना कार्यवाहीचे निर्देश दिल्यावरुन मा.सचिवांनी दिलेल्या निर्देशानुसार संबंधित आयुक्तालयाने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिल्यावरून प्रकल्पबाधित मौजे सिनगाव जहाँगीर येथे नवीन आरोग्य केंद्र मंजुरीसाठी प्रस्ताव सन 2020/21मध्ये जिल्हा परिषद मार्फत शासनाच्या आरोग्य विभागास चौथ्यान्दा सादर करण्यात येऊनही महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्य आरोग्य विभागाच्या आयुक्तस्तरावरील छाननी समितीने आंतरचे निकषाचे करण देत सदर प्रास्तव अपात्र ठरवला होता.
सदर विषयाची वृत्त वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्द झाल्याने ही बाब डॉ.शशिकांत खेडेकर व संतोष पाटील बंगाळे यांनी भाजपा सेना युतीचे सरकारमधील आरोग्य मंत्री ना.तानाजी सावंत साहेबांचे लक्ष वेधून मागील सरकारच्या काळात झालेल्या राज्य आरोग्य छाननी समितीने सिनगाव जहाँगीर वर अन्याय केल्याचे लक्ष्यात आणून देताच मा.मंत्री महोदयांनी सदर गावास नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजुरीचे आश्वासित केले असल्याने सिनगाव येथे आरोग्य केंद्र स्थापण्याच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या असल्याची माहिती संतोष पाटील बंगाळे यांनी दिली आहे.
( सिनगाव आरोग्य केंद्राचा प्रस्ताव आयुक्त स्तरावरील छाननी समितीने अपात्र ठरवल्याची माहिती मिळताच मा.आ. डॉ.खेडेकर साहेबांनी मंत्रालयात आरोग्य मंत्र्यांना भेटून सिनगाव येथे विशेष बाब म्हणून आरोग्य केंद्राची आवश्यकता लक्षात आणून दिल्यानंतर मंत्रि महोदयांनी येथे प्रा.आ.केंद्र मंजुरीस आश्वासित केले असल्याने गावकाऱ्यांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.)
(संतोष बंगाळे पाटील)