सतीश पाटील तेजनकर लोणार ता .सुलतानपूर येथे एकात्मीक बालविकास सेवा योजणा लोणार च्या अर्तगत सुलतानपुर बिट मध्ये पोषण माह निमित्य आरंभ- आकार पालक मेळावा ता . २३ संपन्न झाला .सुलतानपुर येथील वेदात आश्रम परिसरात आयोजीत ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिखलीचे बाल विकास प्रकल्प अधिकारी मा.श्री गवळी हे होते, कार्यक्रमाचे उदघाटन मा. श्री अरविंद रामरामे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बाल विकास यांनी केले. कार्यक्रमा मध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजना लोणार अंर्तगत बिट सुलतानपुर १ मधील सेविका व मदतनीस यांनी गरोदर, स्तनदा माता व ० ते २ वर्ष वयोगटातील बालके यांच्या पोषण व वाढी बाबत ची माहीती प्रदर्शनी व्दारे सादर करण्यात आली होती तर ३ ते ६ वर्ष वयोगटील बालकांना अंगणवाडी मधे कशा प्रकारे शालेय पुर्व शिक्षण दिले जाते या उपक्रमाची प्रदर्शनी आयोजित करुण पालकांना माहीती देण्यात आली . दरम्याण उपस्थित पालकांना गट विकास अधिकारी पंचापत समिती लोणार मा. वृक्षाली यादव , सहाय्यक गट विकास अधिकारी मा.श्री गजानन पाटोळे , डॉ राजमाने व माजी जि . प . सभापती आशाताई झोरे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी पर्यविक्षीका अंगणवाडी सेविका, मदतनीस सुलतानपुर बिट १ यांणी अथक परिश्रम घेतले तर कार्यक्रमामधे गरोदर व स्तनदा मातांना वृक्ष भेट देण्यात आली . कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ अश्विनी ठाकरे यांनी , व सुत्रसंचालन उज्वला शिंगणे व आभार प्रदर्शन विध्या नव्हाळे यांनी केले.
क्रॅप्शन : एकात्मीक बालविकास सेवा योजनेचे अधिकारी व उपस्थीत