चिखली रविंद्र तोडकर राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी चिखली शहराची मागणी चिखली:- राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी शहराच्या वतीने जिल्हाधिकारी बुलडाणा यांना तहसिलदार चिखली मार्फत निवेदन सादर करण्यात आले की, दुय्यम निबंधक कार्यालय नगर परीषद कार्यालय चिखली येथे भाडेतत्वार सुरु होते. तसेच सदर न.प. चि जागा इमारत ही जीन झालेली असून (१८७८) मधील असल्याने ती इमारत मध्ये कधीही कोणताही अनुचित प्रकार घडु शकतो. तसेच दुय्यम निबंधक कार्यालय हे न.प. जागेतच ठेवण्यासाठी काही स्वार्थी लोक हे स्वहितासाठी जनसामान्यांच्या जिवाशी खेळण्याचे कुटील कारस्थान रचत आहेत ते हाणून पाडावे. सदर ठिकाणी ग्रामीण व शहरीभागातील नागरीकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. सदर ठिकाणी महिलांना बसण्याची व्यसथा नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, कोणतीही जनसुविधा नाही, वारंवार चकरा मारुन जास्त समस्यांचा सामना करावा लागत असल्याने त्यांची हि दैनिअवस्था बघवत नाही. तसेच बुलडाणा जिल्हयाची आर्थीक राजधानी म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या चिखली तालुक्यातील प्रत्येक ग्रामीण भागातुन येणार्या नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच बाबुलॉज चौक ते नगर परीषद रोडवर वाहतुक कोंडीचा सुध्दा सामना इतर नागरीकांना नाहक सहन करावा लागत आहे. तसेच दुय्यम निबंधक कार्यालयास विविथ सदर जागा अपुरी असल्याने तेथे नेहमी मोठया प्रमाणात गर्दी होत असते त्या गर्दी मध्ये कोणताही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.या उलट पाठबांधारे विभागाच्या परीसरात दुय्यम निबंधक कार्यालय असल्यास तेथे ऐसपैस जागा आहे. वृक्षांची सावली आहे. निसर्गरम्य वातावरण आहे. महिला, वयोवृध्द नागरीकांना सुध्दा बसण्याची व्यवस्था आहे. दुय्यम निबंधक कार्यालय हे पाठबांधारे विभागातच कायमस्वरुपी ठेवण्यात यावे अशी मागणी जनतेतुन होत असल्याने राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी चिखली शहराचे अध्यक्ष रविंद्र तोडकर यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले आहे. तसेच मागणी पुर्ण न झाल्यास लोकशाही मार्गाने तिव्र आंदोलण छेडण्यात येईल असा ईशारा सुध्दा देण्यात आला आहे. यावेळ सौ. ज्योतीताई खेडेकर विभागीय महिला अध्यक्षा, प्रमोद पाटील अध्यक्ष विधानसभा, तालुका अध्यक्ष दिपक म्हस्के, शहर अध्यक्ष रवींद्र तोडकर, जिल्हा सरचिटणीस राम खेडेकर, शहर कार्यध्यक्ष रहिम पठाण, शहर उपाध्यक्ष निमराव देशमुख, प्रमोद चिंचोले, सदानंद मोरगंजे, भाई प्रशांत डोंगरदिवे, तुकाराम सोळंकी, मलीक सौदागर, रामकिसन जाधव, युवक शहर अध्यक्ष सागर खरात, प्रतापसिंग पवार, प्रशांत झीने, निलेश जाटोळ, नसिर कुरेशी, कल्पनाताई केजकर, शहर अध्यक्षा महिला बानुबाई जैवाळ हे उपस्थीत होते.