मुंबई,प्रतिनिधी- कठोर परिश्रम , जिद्दीच्या बळावर पत्रकारितेत सक्रिय राहून दैनिक खोज मास्टर च्या माध्यमातून संपादक रमेश चव्हाण यांनी राज्यभरात दैनिक खोज मास्टर चा यशस्वी ठसा उमटवला आहे. मातृत्व बुलढाणा जिल्ह्यामधून सुरू झालेले हे वर्तमानपत्राचे प्रमोशन करीत असताना नामदार प्रतापराव जाधव यांनी हे उद्गार काढले.
5 मार्च रोजी विष्णुदास भावे नाट्यगृह नवी मुंबई वाशी येथे खोज मास्टर न्यूज चैनल च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य दिव्य टॉप शोमध्ये आयुष स्वतंत्र प्रभार तथा आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री प्रतापराव जाधव यांनी दैनिक खुजमास्टरच्या मुंबई आवृत्तीचे प्रकाशन केले यावेळी नवी मुंबई जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर, महिला जिल्हाध्यक्ष सरोज ताई पाटील, शितलताई कचरे, नगरसेविका सौ अनिताताई सुरेश मानवतकर सभापती नगरपरिषद नवी मुंबई यांच्यासह अनेक शिवसैनिक पदाधिकारी यांची उपस्थिती लाभली होती. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेची पूजा करण्यात आली. नामदार प्रतापराव जाधव यांच्या स्वागत खोजमास्टरच्या मिडियाच्या वतीने नामदारांचा सत्कार समारंभात लक्ष्मीपती बालाजी ची मूर्ती, पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. मान्यवरासह तेथील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर लाईव्ह टॉक शोला सुरुवात झाली. हा शो खेळीमेळीच्या वातावरणात नामदार प्रतापराव जाधव यांच्या राजकीय तथा वैयक्तिक जीवनपटलावर आधारित विविध प्रश्नांना दिलेल्या प्रतिसादाला प्रत्येक क्षणी टाळ्यांचा कडकडाट होत होता. संपादक रमेश चव्हाण यांनी काही प्रश्न कोंडीत पकडण्यासारखे विचारले असता मंत्री महोदयांनी अगदी सहज साध्या भाषेत त्या प्रश्नांची समर्पित उत्तर देत अभ्यासू व्यक्तिमत्व असल्याची छाप सोडली. या सदरा दरम्यान जिल्ह्यातील राजकीय घडामोडीसह आयुष विभागाअंतर्गत करण्यात आलेल्या अलौकिक कामगिरी म्हणजे 30 दिवसात 13 वेळा गिनीज बुक मध्ये नाव नोंदवून जागतिक विक्रम करण्याची मालिका सुद्धा विशारद करण्यात आली आहे. आगामी काळात आयुष मंत्रालया अंतर्गत बेरोजगारी, आरोग्य, राष्ट्रहित लक्षात घेऊन या संदर्भात मोठ्या प्रमाणात कार्यप्रणाली सुरू करण्यात येणार आहे. अशा प्रकारची ग्वाही आपल्या चर्चासत्रामधून नामदार प्रतापराव जाधव यांनी दिली. सर्वसामान्य जनतेने विचारलेल्या कॅन्सर, शिक्षण ,बेरोजगार, महिला संरक्षण, हिंदुत्व बाबत अनेक खुलासे करताना जनतेला विश्वास प्राप्त होईल अशा पद्धतीचे समर्पक उत्तर यावेळी त्यांनी दिले. बीएसएनएल कर्मचाऱ्यांची पेन्शन असेल, विदेशातील डॉक्टर पदवीधारक विद्यार्थ्यांची देशातील परीक्षा संदर्भात असलेली समस्या यावर विशेष लक्ष केंद्रित करून सदर विषय वैयक्तिक पातळीवर हाताळणार असल्याची त्यांनी पुष्टी केली. नवी मुंबई परिसरात अनेक शासकीय अनुदानित मोठी हॉस्पिटल्स आहेत या ठिकाणी गोरगरिबांना उपचारासाठी असलेला राखीव कोठा तपासणार असून संबंधित यंत्रणेची लवकरच मीटिंग लावण्यात येईल त्याचप्रमाणे यावर दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचे जाहीर आश्वासन लाईव्ह टॉक शोमध्ये त्यांनी केले. माझे जीवन सुरुवातीपासून संघर्षमय आहे. राजकीय ओढ मला युवा अवस्थेपासूनच निर्माण झाली होती. शालेय महाविद्यालयीन जीवनात युवांना जोडण्याचे काम करताना संघटन कौशल्य प्राप्त झाले. राजकारणी व्यक्तींनी अहंकार मनाशी बाळगू नये सर्वसामान्य व्यक्तीच्या सुखदुखात धावून जाण्यात त्यांची हित आहे. मतदार राजा आपल्यापासून दुरावला तर पुढील पाच वर्षात राजकीय व्यक्ती राजकारणामधून जनता बाहेर काढत असते. त्यामुळे सर्वसामान्य मतदार कायम माझ्या पाठीशी उभे आहेत त्यांचाच आशीर्वाद म्हणून मागच्या आठ निवडणुकीमध्ये माझ्या विजयाचा आलेख चढताच आहे. मला मिळणार जन्मत हे माझ्या आयुष्यातील खरीपुंजी आहे अशा प्रकारचे उदात्त उद्गार काढत त्यांनी मतदार राजांचे अभिनंदन तथा आभार मानले.
रमेश चव्हाण माझ्या तालमीतच घडला
मेहकर शहरातून सुरू केलेल्या दैनिक होजमास्टर वर्तमानपत्र न्यूज पेपर ,न्यूज चैनलची यशोगाथा म्हणजे मुंबईत नवी मुंबई आवृत्तीचे प्रकाशन आहे. रमेश ला मी बालपणापासून ओळखतो जिद्द आणि चिकाटी त्यामध्ये भरलेली आहे कोणतेही कार्यकर्त्यांना त्यांनी केलेल्या संघर्षाचा मी सुद्धा साक्षीदार आहे. ग्रामीण भागातून सुरू केलेल्या खोज मास्टर मीडियाची आज नवी मुंबई येथे एका नाट्यगृहात प्रमोशन करणे याला खूप मोठी हिम्मत लागते. कार्यक्रमात लोकांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी साकारलेल्या स्वप्नाला माझे पाठबळ आहे. मातृत्व बुलढाणा जिल्ह्यातून सुरू झालेल्या खोद मास्टर मीडियाचे लवकरच राज्यभर नेटवर्क उभे राहील यात मला शंका नाही. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने कार्यक्रमाचे नियोजन झाले यामुळे रमेश चव्हाण प्रगल्भ झाला असे म्हणायला हरकत नाही. खोज मास्टर मीडियाला भविष्यात सर्वतोपरी सहकार्य असेल खोज मास्टर मीडियाच्या पुढील वाटचालीस माझ्याकडून शुभेच्छा असे ते यावेळी बोलत होते.
जागतिक महिला दिनानिमित्त नवी मुंबई येथे दहा महिलांचा सत्कार
कार्यक्रमादरम्यान कर्तृत्ववान महिलांना यावेळी ट्रॉफी देऊन गौरवित करण्यात आले. नामदार प्रतापराव जाधव यांच्या हस्ते हा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी सुरेश मानवतकर सो. अनिता सुरेश मानवतकर,अॅड. ,शितल हनवते,रेखा इंगळे,मनीषा कांबळे,नलीना कांबळे,पूजा कोठंबे,मोनाली वाघमारे, सरोजताई पाटील, शितल आचरे या विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवर महिलांचा गुणगौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे मागणी येथील मूळ रहिवासी असलेले शिवसेना नेते सुरेश मानवतकर यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक डोणगाव येथील शिक्षक गजानन सातपुते यांनी तर आभार प्रदर्शन संपादक रमेश चव्हाण यांनी केले.