दिपक मापारी, रिसोड शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पासून वंचित राहण्याची भीती.. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा काढला. अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यावर त्याची रितसर कंपनीकडे तक्रारही केली. परंतु तक्रार करून दोन महिन्याचा कालावधी लोटूनही अजूनही कंपनीने नुकसानीची पाहणी न केल्यामुळे नुकसानीच्या मदतीपासून वंचित राहण्याची भीती आता शेतकऱ्यांना सतावत आहे..अनेक शेतकऱ्यांनी बँका कडून केलेल्या कर्जाच्या रकमेतून कापूस ,सोयाबीन, तुर, आधी पिकांचा प्रधान मंत्री पीक विमा काढला. बँकांनी विमा कंपनीकडे हप्त्या पोटी शेतकऱ्याची रक्कम ही अदा केली. तर अनेक शेतकऱ्यांनी खाजगी शेतू केंद्रातून प्रधानमंत्री पिक विमा काढला. जुलै, ऑगस्ट महिन्यात झालेली अतिवृष्टी आणि व पक्षाचे हल्ले यामुळे सोयाबीन, कापूस, तूर, पिकाचे मोठे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांची पिके हाताची गेली. शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले. अनेक शेत आजही पडून आहेत. या संदर्भात शेकडो शेतकऱ्यांनी कंपनीकडे ऑनलाइन तक्रार केली. या गोष्टीला आता दोन महिन्याचा कालावधी होत आहे. परंतु विमा कंपनीकडून अजूनही अनेक शेतातील नुकसानीचे पंचनामे करायला कोणीही आलेले नाही. त्यामुळे नुकसानीच्या मोबदल्यापासून वंचित राहण्याची भीती या शेतकऱ्यांना सतावत आहे..
सरसकट विमा लागू करण्याची मागणी..-
तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी पीक कर्जातून व खाजगी केंद्रा वरून आपल्या पिकाचा विमा काढला. आता नुकसानीची माहिती कंपनीला देण्यासाठी शेतकऱ्यांना मोबाईल वरून ऑनलाईन तक्रार नोंदवण्याची आहे. परंतु बहुतांश शेतकऱ्यांना ऑनलाइन तक्रार नोंदविता येत नाही. तर दुसरीकडे बँकांनी कर्जाच्या रकमेतून विमा काढल्याने पावती नंबर ही शेतकऱ्याकडे नाही. त्यामुळे हे शेतकरी विमा लाभापासून वंचित राहण्याची भीती आहे. त्यामुळे सरसकट विमा लागू करा अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे..