कै.अण्णासाहेब पाटील यांच्या ८९ व्या जयंतीनिमित्त नांदुरा येथे भव्य व्यावसायिक रोजगार मेळावा संपन्न
श्रीकांत हिवाळे
नांदुरा/प्रतिनिधी :- दि.२५ सप्टेंबर रोजी नांदुरा येथे कै. अण्णासाहेब पाटील यांच्या ८९ व्या जयंती निमित्त बेरोजगार युवकांना व्यवसाय मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला .यामध्ये कै अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आदरांजली वाहण्यात आली .अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ अंतर्गत योजनांची माहिती तसेच व्यवसाय मार्गदर्शन करण्यात आले . या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक श्री पुरुषोत्तम अंभोरे साहेब लाभले. यांनी महामंडळाच्या योजनेची संपूर्ण माहिती उपस्थित मराठा बांधवांना दिली.या बैठकीत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून मराठा समाजाला मिळणाऱ्या विविध योजना,कर्ज मिळण्यामधे येणाऱ्या अडचणी,बिनव्याजी कर्ज मिळण्यासाठी लागणारे कागदपत्रे त्यातील अटी व शर्ती याबाबत मार्गदर्शन केले व मराठा युवकांना जास्तीत जास्त अर्ज करण्याचे व उद्योग उभे करण्यासाठी आवाहन केले .या कार्यक्रमाला शेकडो मराठा युवक उपस्थित होते. सविस्तर मार्गदर्शन करून हा रोजगार मेळावा संपन्न झाला . सदर मेळावा घेण्याची संकल्पना श्री भागवत मुंढे यांनी पुढाकार घेऊन .सकल मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आली.यावेळी प्रमुख उपस्थिती श्री मोहनराव पाटील ,बलदेवराव चोपडे ,बाळासाहेब चांभारे ,संतोष मुंढे ,त्र्यंबक पाटील ,अशोक घनोकर अंबादास धांडे ,राजूभाऊ काटे ,छोटू पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ .शरद पाटील,प्रमोद हिवाळे,अमर रमेश पाटील,पुंडलिक काळे,संतोष जुणारे यांनी परिश्रम घेतले.