प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार -:गेल्या दोन वर्षांपासुन कोरोनामुळे खोडाईमाता यात्रोत्सव झाला न्हवता . मात्र शासनाने यंदा सुट दिल्याने मोठ्या उत्साहात यंदा नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे . नवरात्रोत्सवानिमित्त उद्या दि .२६ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या नंदुरबार शहरातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या खोडाईमाता यात्रोत्सवास सुरुवात होणार आहे . यानिमित्त रंगरंगोटी , विद्युत रोषणाई , मंदिर परिसरात स्वच्छता आदी पुर्ण झाली आहेत . मंदिर परिसरात विविध मनोरंजनासाठी पालख्या दाखल झाल्या असुन दुकाने थाटण्यासाठी दुकानदारांची लगबग काल दिवसभर चालू होती . घटस्थापनेच्या दिवसा पासुन खोडाईमाता यात्रोत्सवास सुरवात होते.९ दिवसांपर्यंत येथे यात्रा भरते . पहिल्या दिवशी घटस्थापना करण्यात येते . नंदुरबार जिल्ह्यातील भाविकांसह परराज्यातील परराज्यातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या खोडाईमाता मुर्तीची स्थापना सुमारे चारशे वर्षापुर्वी झाली आहे . शहराच्या ईशान्य दिशेला असलेल्या या मातेचा लिखीत इतिहास उपलब्ध होत नाही . मात्र सुमारे २५० वर्षांपासून या देवीचा उत्सव दरवर्षी नवरात्रात साजरा केला जातो . नंदुरबारकरांचे श्रध्दास्थान असलेल्या मंदिरातील खोडाई मातेची मूर्ती स्वमंभू आहे . मोठ्या दगडांमधून ही मुर्ती प्रकट झाली असल्याचे जुन्या जाणकारांकडून सांगण्यात येते.लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मातेच्या दर्शनासाठी व नवस , मान मानता फेडण्यासाठी नवरात्रमध्ये येथे भाविकांची प्रचंड गर्दी होत असते . ही मुर्ती लिंबाच्या झाडाच्या खोडाला लागून असल्याने खोडाईमाता असे नांव पडले आहे ,यात्रेच्या काळात नंदुरबार पालिकेतर्फे येथे साफसफाईचे काम करण्यात येते . मंदिर परिसराला आकर्षक रंगरंगोटी केली जाते.खोडाई मातेच्या यात्रेसाठी शहरासह ग्रामीण भागातील भाविकांची येथे लाखोंच्या संख्येने हजेरी लागते.परराज्यातील व्यावसायिक नऊ दिवस आपली दुकाने थाटतात . पाळणा व मनोरंजनाची साधने यात्रेत उपलब्ध होतात . खेळणी व संसारोपयोगी वस्तुंची विक्री होऊन मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत असते . पोलिस विभागा तर्फे यात्रा काळात चोख बंदोबस्त लावला जातो .शहरातील मान्यवरांतर्फे यात्रेकरूंचे स्वागत करणारे फलक जागोजागी लावले जातात.नवरात्रीच्या नऊ दिवसांपर्यंत येथे मोठ्या प्रमाणात शहरवासीयांचे धार्मिक विधी अव्याहतपणे सुरूच असतात . खोडाईमाता ही देवी मनोकामना पूर्ण करीत असल्याची दृढ श्रध्दा आहे . शहरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या खोडाईमातेच्या मंदिरावर नवस फेडण्यासाठी गर्दी होत असते . विशेषतः देवीच्या यात्रौत्सवात भाविक रात्री मोठ्या संख्येने हजेरी लावत असतात . गरबा मंडळांकडून तयारी… नंदुरबार शहरात व नवीन वसाहतींमध्ये गरबा मंडळांची स्थापना करण्यात येणार आहे . शहरातील जुन्या वसाहतींमध्ये काही जुने गरबा मंडळ आहेत . या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांकडून गरबा नृत्यासाठी परिसराची सजावट साफसफाई करण्याचे काम सुरू आहे . काही मंडळांकडून सांस्कृतिक कार्यक्रम व विविध स्पर्धांचे आयोजनही करण्यात येते . बाजारात खरेदीसाठी गर्दी.. घटस्थापनेच्या पुर्वसंध्येला खरेदीसाठी गर्दी केली होती . यात बाजारात घटस्थापनेसाठी लागणारे मातीचे मडके विक्रीसाठी उपल्ब्ध होते .३० ते ७० रूपयांपासुन विक्री होत होते , पुजेसाठी लागणारे साहित्य घेण्यासाठी नागरीकांनी गर्दी केली होती . गरब्याची मोठी धुम. गुजरात राज्यात नवरात्रीत गरब्याची मोठी धुम असते . गुजरात राज्याला लागुन असलेला नंदुरबार जिल्हातही नवरात्रोत्सव धुमधडाक्यात मनवला जातो . मात्र यंदा जिल्ह्यात मुर्तीत दरवाढ झालेली दिसुन येत आहे