शेतकऱ्यांच्या सोयाबीन ला दहा हजार भाव द्या :- रिपब्लिकन सेनेची मागणी

Khozmaster
2 Min Read

चिखली;- शेतकऱ्यांच्या सोयाबीन ला प्रती क्विंटल दहा हजार भाव मिळावा म्हणून रिपब्लीकन सेनेच्या वतीने तहसीलदार साहेब यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री साहेब यांना दि.26/9/2022 रोजी बुलढाणा जिल्हाध्यक्ष भाई विजयकांत गवई, बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष ब्रम्हाभाउ साळवे, जिल्हा महासचिव सलीमभाई पदाधिकारी व असंख्य कार्यकर्त्यांच्या सह्यानिशी निवेदन दिले. कोरोना महामारी मध्ये शेतकरी हवालदिल होऊन पिंजला गेला आहे शेतकऱ्यावर कधी आसमानी तर सुलतानी संकट चालू असतात या संकटाचा सामना करण्यासाठी शेतकऱ्याला सोयाबीन या पिकांना हमीभाव सरसकट किमान दहा हजार देण्यात यावा. शेतकरी राजा शेतात कष्ट करून सगळ्याचे पोट भरत होता, आज सगळ्यांचे व्यवसाय सुरळीत चालू आहे, पेट्रोल,गॅस, खाद्य पदार्थ सगळ्यांचेच भाव गगनाला भिडले आहे, शेतकऱ्याने सोयाबीन पेरली की भाव वाढतात व ऐन शेतकऱ्याची सोयाबीन काढणीला आली की भाव गडगडतात, असे कट कारस्थान करून व्यापारी व सरकार शेतकऱ्यांना देशोधडीला लावत आहे, सोयाबीन पेरणी वेळेस ८००० प्रती क्विंटल भाव होता परंतू आज सोयाबीन काढणीच्या वेळी 4000ते 5000 हजार भाव असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे, शेतकऱ्यांच्या सोयाबीन ला किमान दहा हजार प्रती क्विंटल भाव देण्यात यावा, या मागणीवर तत्काळ निर्णय घेऊन भाव जाहीर करावा अन्यथा या रिपब्लीकन सेनेच्या वतीन उग्र आंदोलन छेडण्यात येईल, कुठेही अनुचित प्रकार घडल्यास याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनाची राहील. असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतेवेळी चिखली ता. अध्यक्ष श्याम लहाने, शहराध्यक्ष सुनील सोळंके, शहर उपाध्यक्ष रमेश आंभोरे, युवा शहर अध्यक्ष शेख मलिक, उपाध्यक्ष सतीश पवार, उपाध्यक्ष वसीम भाई, ऋषिकेश हिवाळे, अप्पू खान, शेख दानिश, दीपक तायडे, सौरभ बावस्कर, विकी निकाळजे, यश बावस्कर, राम बावस्कर, प्रदीपभाऊ हिवाळे, विलास गवई, तोरणवाडा, विश्वनाथ सपकाळ वाघापूर रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी होते.

 

0 6 6 8 3 8
Users Today : 14
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

17:57